Tarun Bharat

तिळामळ गणेशोत्सव मंडळाच्या देणगी कूपन विक्रीचा प्रारंभ

वार्ताहर /केपे

तिळामळ, केपे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 19व्या उत्सवाच्या देणगी कूपन विक्रीचा शुभारंभ मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश क्राबाल, समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकात कवळेकर, माजी मंत्री डॉमनिक फर्नांडिस, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई, केपे नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, नगरसेवक चेतन ह़ळदणकर, अध्यक्ष ज्ञानेश्वर मळकर्णेकर, गुरू नाईक, रेमेडियो रिबेलो व इतर मान्यवर हजर होते.

गेली दोन वर्षे कोविड महामारीमुळे उत्सवात खंड पडला होता. तो दूर होऊन ह़ळूहळू परिस्थिती मूळ पदावर येत आहे. इलेक्ट्रिकल वाहनांच्या खरेदीतही वाढ होत आहे. ही चांगली गोष्ट आहे. आपण संबंधित खात्याचे मंत्री असताना गोव्यात इलेक्ट्रिल वाहनांच्या विक्रीचा शुभारंभही केला होता. त्यांची किंमतही आता कमी होत असल्याचे दिसून येते. देणगी कुपनावरील बक्षिसांपोटी सर्व इलेक्ट्रिक स्कूटर्स ठेवल्या  आहेत. ही चांगली गोष्ट असल्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी सागितले.

श्नी गणेश हे आराध्य दैवत असून त्याच्या उत्सवाचे मोठे स्वरूप म्हणून आज सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. तो लोकमान्य टिळकांनी सुरू केला. सर्वांना एकत्र आणण्याच्या हेतूने त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. एकसंध राहून चांगले कार्य केले आहे. कोणतीही संस्था स्थापन करणे सोपे असते, पण ती टिकवणे कठीण असते. हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्व स्तरांतील लोकांना एकत्र घेऊन कार्य करणारे मंडळ आहे, असे चंद्रकात कवळेकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन रेमेडियो रिबेलो यांनी केले, तर ज्ञानेश्वर मळकर्णेकर यांनी स्वागत केले.

Related Stories

पर्रा वरद सिद्धिविनायकाचा वर्धापनदिन

Patil_p

काणकोणात 92 हजारांचा गांजा जप्त

Amit Kulkarni

मांद्रेत पार्सेकर, सोपटेंकडून एकाचदिवशी कार्यक्रमाचे आयोजन

Patil_p

‘शोध सुखाचो’ नाटय़पुस्तकाचे प्रकाशन

Amit Kulkarni

फसवे अंदाजपत्रक मुख्यमंत्र्यांकडून सादर

Patil_p

‘डीएसएसएस’चे पैसे ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात जमा करा

Omkar B