Tarun Bharat

जितो लेडीज विंगच्या वस्तू प्रदर्शनाला प्रारंभ

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

जितो लेडिज विंगतर्फे दोन दिवशीय वस्तु प्रदर्शन आणि विक्रीला सुरूवात झाली आहे. येथील मिलेनियम गार्डनमध्ये या वस्तु प्रदर्शनाचे उद्घाटन गुन्हे तपास आणि वाहतूक विभागाच्या उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, वीणा लोकूर यांच्या हस्ते झाले.

या प्रदर्शनात साडी, डेस, ज्वेलरी आणि खाद्यपदार्थ ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदीदारांना एकाच ठिकाणी विविध साहित्य आणि पदार्थांची चव चाखता येणार आहे. विशेषतः महिलांसाठीदेखील विविध साहित्य या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

जितोच्या अध्यक्षा रूपाली जनाज यांनी स्वागत केले. यावेळी वीणा लोकूर यांनी करिअरमधील कसोटीचे क्षण सांगून स्वतःवर विश्वास असला तर त्यातून बरेच काही बाहेर पडू शकते, असे सांगितले.

यावेळी पी. व्ही. स्नेहा म्हणाल्या, ‘आज स्त्री सक्षम झाली असून, विविध ठिकाणी आघाडीवर आहे. शिवाय स्त्रियांचा दृष्टीकोन सकारात्मक झाला असून, त्या प्रत्येक गोष्टीत पुरूषांसोबत काम करताना दिसत आहेत. जितो लेडिज विंगमार्फत महिलांना प्रेरणा दिली जात आहे.’

याप्रसंगी जितो बेळगावचे अध्यक्ष पुष्पक हणमण्णावर, सतीश मेहता, भारती हर्दी, कार्यवाह विक्रम जैन यांनीदेखील मार्गदर्शन केले. यावेळी अभियंते रोहीन लेंगडे यांची नासामध्ये इंटर्न म्हणून निवड झाल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव अमित जोशी, दीपाली पत्रावळी, यूथ विंगचे जक्कण्णावर यासह सभासद उपस्थित होते. कार्यवाह रूमा पाटील यांनी आभार मानले.

Related Stories

मिरवणूक नाही तरीही 12 तास चालले विसर्जन

Rohan_P

विनामास्क प्रकरणी कॅन्टोन्मेंट आकारणार दंड

Patil_p

विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू

Patil_p

मनपातील कर्मचाऱयांसाठी स्वतंत्र हॉस्पिटलची सोय करा

Patil_p

गोकुळ युवक मंडळाची स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni

तपासणीसाठी सिव्हिलमध्ये येणाऱया संशयितांचा ओघ सुरूच

Patil_p
error: Content is protected !!