Tarun Bharat

ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या एसएसएलसी व्याख्यानमालेला प्रारंभ

आठ केंद्रांमध्ये एकूण 814 विद्यार्थी उपस्थित

वार्ताहर /कणकुंबी

गेल्या दहा वर्षांपासून खानापूर तालुक्मयाचा एसएसएलसी परीक्षेचा निकाल वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल उचललेल्या खानापूर तालुका ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेला सुरुवात झाली आहे. तालुक्मयातील मराठी आणि कन्नड माध्यमांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी यावषी दि. 4, 11 आणि 18 डिसेंबर असे तीन रविवार व्याख्यानमालाचे आयोजन केले असून 4 डिसेंबर रोजी तालुक्मयातील पाच मराठी केंद्रांवर तर तीन कन्नड केंद्रांवर अशा एकूण आठ केंद्रांत व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला. या आठ केंद्रामधून एकूण 814 विद्यार्थ्यांनी व्याख्यानमालेचा लाभ घेतला.

बाबुराव ठाकुर कॉलेज जांबोटी

जांबोटी येथील बाबुराव ठाकुर महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जांबोटी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष महेश गुरव होते. यावेळी ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पिटर डिसोझा, पी. के. चापगावकर, विलास बेळगावकर व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पीटर डिसोझा म्हणाले, विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेत उत्तम यश मिळावे यासाठी ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा वर्षांपासून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी सर्व विषयांचे सखोल ज्ञान मिळविले पाहिजे. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा उपयोग करून परीक्षेत चांगले गुण मिळवायचे आहेत, असे सांगितले.

एस. जी. चिगुळकर यांनी प्रास्ताविक केले. एम. व्ही सडेकर व एम. डी. पाटील यांनी स्वागत केले. यावेळी संजीव वाटूपकर, विलास बेळगावकर, पी. के चापगावकर यांची मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. सूत्रसंचालन महेश सडेकर यांनी केले तर सी. एस. कदम यांनी आभार मानले. जे. बी. मुतगेकर यांनी विज्ञान विषयाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जांबोटी, कणकुंबी, बैलूर, ओलमणी व आमटे या पाच हायस्कूलचे सुमारे अडीचशे विद्यार्थी उपस्थित होते.

अन्य सात केंद्रांवर व्याख्यानमालेचा शुभारंभ

ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्यावतीने तालुक्मयातील हलशी, नंदगड (कन्या व महात्मा गांधी हायस्कूल) चापगाव, देवलत्ती व गंदीगवाड आदी ठिकाणी झालेल्या व्याख्यानमालेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी हलशी केंद्रातील शिवाजी हायस्कूलमध्ये व्याख्यानमालेच्या शुभारंभप्रसंगी नागाप्पा देसाई अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकांत देसाई, अर्जुन देसाई, एन. एम. देसाई, के. आर. गुरव, टी. एल. सुतार, मधुसुदन देसाई आदीं उपस्थित होते.

नंदगड येथील कन्या विद्यालयात मराठी माध्यम व्याख्यानमालेत 85 विद्यार्थी उपस्थित होते. नंदगड येथील कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी म. गांधी हायस्कूलमध्ये 45 विद्यार्थी उपस्थित होते. इदलहोंड येथील केंद्रात ए. एम. लोहार उपस्थित होत्या.

देवलती केंद्रात 95 विद्यार्थी तर गंदीगवाड केंद्रात 83 विद्यार्थी उपस्थित होते. तालुक्यात या व्याख्यानमालेमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असून पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Related Stories

मटका अड्डय़ांवर छापे,सहा जणांना अटक

Tousif Mujawar

मंडोळीत दीड कोटी निधीतून तीन मंदिरांचा जीर्णोद्धार करणार

Amit Kulkarni

बाची येथे गांजा विकणाऱ्या तरुणाला अटक

Patil_p

गर्लगुंजीत श्रीकृष्ण मंदिराचा उद्या लोर्कापण सोहळा

Amit Kulkarni

इनफीनिटम व्योमामध्ये ज्ञानप्रबोधन मंदिरचे सुयश

Amit Kulkarni

विद्यार्थिनींना आता शेतकरी विद्यानिधी

Amit Kulkarni