कागद उपलब्ध होत नसल्याने पाठय़पुस्तक छपाईला विलंब : सध्या 41 टक्के पुस्तके उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
शाळा सुरू झाल्याने शिक्षण विभागाकडून पुस्तकांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. जितकी पाठय़पुस्तके शिक्षण विभागाकडे उपलब्ध आहेत, ती शाळांना दिली जात आहेत. यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके मिळणार असून, इतर पाठय़पुस्तकांसाठी वाट पहावी लागणार आहे.
युपेन-रशिया युद्धामुळे कागदाची कमतरता जाणवत आहे. कागद उपलब्ध होत नसल्याने पाठय़पुस्तक छपाईला विलंब होत आहे. काही वर्गातील समाजविज्ञान व कन्नड विषयाच्या पुस्तकांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या पुस्तकांचे डीटीपीचे काम अंतिम टप्प्यात असून काही दिवसात छपाई केली जाणार आहे. कागद उपलब्ध होत नसल्याने छपाईला विलंब होत असल्याचे बेंगळूर येथील पिंटर्स असोसिएशनने स्पष्ट केले होते.
सरदार्स हायस्कूल येथील पाठय़पुस्तक गोडावूनमधून जितकी पुस्तके उपलब्ध आहेत, तितकी शाळांच्या ताब्यात दिली जात आहेत. सध्याच्या घडीला केवळ 41 टक्के पुस्तके उपलब्ध असल्याची माहिती आहे. यावषी एकतर पुस्तकांच्या छपाईसाठी वेळ लागला आणि त्यातच शाळा लवकर सुरू झाल्याने अजून काही दिवस तरी काही विषयांच्या पुस्तकांसाठी विद्यार्थ्यांना वाट पहावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांना बुकबँकचा आधार
ज्यावेळी नवीन पाठय़पुस्तके वेळेत उपलब्ध होत नाहीत, त्यावेळी मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांची जुनी पुस्तके विद्यार्थ्यांना दिली जातात. या उपक्रमाला बुकबँक म्हणून ओळखले जाते. जोवर नवीन पाठय़पुस्तके उपलब्ध होणार नाहीत, तोवर विद्यार्थ्यांना या बुकबँकचा आधार घ्यावा लागणार आहे. शिक्षण विभागाने तशी सूचनाही शाळांना केली आहे.