Tarun Bharat

यळेबैल येथील दुर्गामाता मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ाला प्रारंभ

Advertisements

मंडपाची मुहूर्तमेढ : आज मूर्तीची गावात मिरवणूक : शुक्रवारी उद्घाटन सोहळा

वार्ताहर /किणये

यळेबैल येथील दुर्गामाता मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ाला मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. यानिमित्त चार दिवस गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवार दि. 25 रोजी सकाळी 8 वाजता गावात दुर्गामाता मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंदिर परिसरात मंगळवारी मंडपाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम झाला. वैजू अष्टेकर यांच्या हस्ते मुहूर्तमेढ पूजन करण्यात आले.

बुधवारी गावात मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. गुरुवारी वास्तुशांती सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता हरिपाठ होणार आहे. रात्री 8 वाजता कोल्हापूर येथील हभप प्रदीप भाटे यांचे कीर्तन, निरुपण होणार आहे.

दि. 27 रोजी मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. यावेळी विविध मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. मूर्तीप्राणप्रतिष्ठापना व इतर कार्यक्रम रुद्रकेसरी मठ, लक्ष्मीटेक बेळगाव येथील प. पू. हरिगुरु महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत.

Related Stories

हालगा येथे शेतकऱयाची आत्महत्या

Rohan_P

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा

Amit Kulkarni

आम्हाला तातडीने घरे मंजूर करा

Patil_p

पोलिसांसाठी देखील आता कॅन्टीन सुविधा

Patil_p

कर्नाटकः रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

Abhijeet Shinde

विद्युत विभागाचे खासगीकरण करू नये

Amit Kulkarni
error: Content is protected !!