प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे येथे चंदेरी महोत्सवात कला व क्रीडा एका नाण्याचा दोन बाजू असे युवा द कुडचडे तर्फे आयोजित केलेल्या. अखिल गोवा शरीर सौ÷व स्पर्धेतून पाहण्यास मिळाले. चंदेरी महोत्सवात आयोजित केलेल्या. ह्या तिस-या वाषीक स्पर्धेचे उदघाटन चंदेरी महोत्सवाचे कार्याध्यक्ष तथा कुडचडे जिमखाना ह्या कुडचडय़ातील पाहिल्या व्यायामशाळेचे संस्थापक मोर्त? नाईक ह्याच्या हस्ते. अ. गो.. बा?डी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष वास्का?चे आमदार दाजी साळकर ह्याच्या उपस्थितीत पारंपरिक समई प्रज्वलित करून शानदार उदघाटन झाले.
यावेळी व्यासपीठावर युवा द कुडचडेचे अध्यक्ष तथा गोवा क्रिकेट असोसिएशनचे सेपेटरी रोहन देसाई, चंद्रकांता बिल्डर्सचे संदीप नाईक, ॐकार वस्त, बाबुराव नाईक होते. उदघाटन प्रसंगी बोलताना आमदार साळकर यांनी बा?डी बिल्डर्सच्या कल्याणार्थ शासकीय योजना पुढे आणण्यास आपण कट्टीबध्द आहे. तसेच दयानंद कला केंद्राने ह्या महोत्सवात ही गोवा पातळीवरील स्पर्धा आयोजनास संधी देऊन कार्यक्रमात समावेश करून घेतला त्यासाठी त्याचे कौतुक ही करतो असे मत व्यक्त केले. हजारो संखेच्या जनसमुदाया पुढे गोव्यातील विविध भागातून मोठय़ा संख्येने सहभागी झालेल्या ह्या क्रीडापटूंचे प्रदर्शन स्पर्धकानी करून दाखविले त्यामुळे शरिर सौ÷वपटूना उत्तेजन लाभले सुरवातीला अध्यक्ष रोहन देसाई यांनी उपस्थिताचे स्वागत केले, रवी देसाई, लेखराज नाईक यांनी स्पर्धेचे सुत्रसंचालन केले प्रेक्षक कक्षात उपस्थितामध्ये कुडचडे जिमखान्याचे अध्यक्ष तथा गोवा असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष मनोहर नाईक, दयानंद कला केंद्राचे उपाध्यक्ष सुभाष नाईक इत्यादी हजर होते. हि स्पर्धा पाहण्यास चंदेरी नगरीत लोकांच्या तुफान गर्दीमुळे चंदेरी महोत्सवालाही चांगली प्रसिद्धी आणि नागरिकांनी चांगलीच दाद दिली. कुडचडे पोलिस स्टेशन वाहतूक विभागाने चांगली व्यावस्था , बंदोबस्त ठेवला होता.