काली-कोलंबिया / वृत्तसंस्था
यंदा राष्ट्रकुल स्पर्धेतील 4ƒ100 मी. रिलेमध्ये सुवर्ण संपादन करणाऱया नायजेरियन पथकातील धावपटू झुबेची ग्रेस न्वाकोचा उत्तेजक चाचणीत दोषी असल्याचे आढळून आले. 21 वर्षीय झुबेचीने मागील महिन्यात बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत नायजेरियाला सुवर्ण जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. नायजेरियाने त्यावेळी नजीकचे प्रतिस्पर्धी इंग्लंड व जमैकाला मात दिली होती. वाडाच्या नियमाप्रमाणे आता झुबेचीवर तात्पुरते निलंबन लागू करण्यात आले असून अंतिम निकाल होईतोवर ती कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.