Tarun Bharat

गुजरातच्या दोन शहरांमध्ये सांप्रदायिक तणाव

Advertisements

खेडा अन् वडोदरामध्ये झाला वाद

वृत्तसंस्था/ वडोदरा

गुजरातच्या दोन शहरांमध्ये सांप्रदायिक तणाव निर्माण झाला आहे. नाडियाड जिल्हय़ातील खेडा शहरात गरबा आयोजन बंद करण्यावरून वाद झाला असून यात किमान 6 जण जखमी झाले आहेत. तर वडोदरा जिल्हय़ातील सावली येथे धार्मिक ध्वज लावण्यावरून दोन गटांमध्ये दगडफेक झाली आहे. पोलिसांनी दोन्ही गटांच्या 40 जणांना अटक केली आहे. खेडा शहरात आरिफ आणि जाहिर नावाच्या दोन जणांच्या नेतृत्वाखाली काही लोकांनी खेडा शहरातील गरबा कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न केला होता, यामुळे तेथील स्थिती बिघडून दगडफेक सुरू झली होती. दोन्ही मुख्य आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेश गोधिया यांनी दिली आहे.

Related Stories

अनन्या आणि ईशान रमले सिक्रेट व्हेकेशनमध्ये

Patil_p

पुलवामात सुरक्षा दलावर गोळीबार; जवान जखमी

datta jadhav

देशात मागील 24 तासात  2 हजार 293 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

देशात ओमिक्रॉनचे आतापर्यंत 78 रुग्ण

Amit Kulkarni

नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल पक्षातून निलंबित

Archana Banage

केंद्र याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार

Patil_p
error: Content is protected !!