फोंड्यात प्रशासन तुमच्या दारीचे ढिसाळ नियोजन : थेट जनतेशी संवाद ऐवजी दिव्यांग बाहेर ताटकळत
फोंडा : फोंडा तालुक्यातील पंचायतींना कचरा प्रकल्प उभारणीसाठी जागेचा अभाव दिसून येतो. भविष्यात पंचायत क्षेत्रातील कोमुनिदादच्या जागेवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारून समस्या सोडविण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले जातील. जेणेकरून फोंड्यातील 19 पंचायतींना आपला स्वतंत्र कचरा प्रक्रिया प्रकल्प मिळेल. स्वच्छ सुंदर नितळ गोय राखण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पाऊल निश्चित उचलणार असे संकेत महसुल मंत्री आंतानासियो उर्फ बाबूश मोन्सेरात यांनी दिले. तिस्क फोंडा येथील प्रशासकीय संकुलात काल शुक्रवारी झालेल्या ‘प्रशासन तुमच्या दारी’ या योजनेअंतर्गत फोंडा तालुक्याच्या भेटीत ते पंचसदस्य व ज नतेशी थेट संवाद कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी फोंडा तालुक्याच्या हद्दितील पंचायत मंडळाच्या समस्या जाणून घेतल्या. बहुतेक सर्व पंचायतीनी कचरा प्रकल्प उभारण्यासाठी होणाऱ्या अडचणीविषयी बोलताना मंत्री मोन्सेरात यांनी कोमुनिदाद जमिनीचा उपाय सुचविलेला आहे. यावर कोमुनिदादच्या समिती कोणती भुमिका घेणार यावर कचरा प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. यावेळी फोंडा पालीकेचे नगराध्यक्ष रितेश रवी नाईक, जिल्हाधिकारी ईग्ना क्लीटस, अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल कुंडईकर व सर्व संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
फोंडयात ‘सरकार तुमच्या दारी’चे ढिसाळ नियोजन
फेंडयातील प्रशासकीय संकुलात आयोजित सरकार तुमच्या दारी उपक्रमाची घाईगडबड उडाल्याची स्पष्ट चित्र दिसत होते. ग्राहक व नागरिकांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी आयोजित कार्यक्रमासाठी अपुऱ्या जागेचा सभागृहाचा निवड करण्यात आली होती. उपजिल्हाधिकारी कार्यालयात केलेली रंगरंगोटी ताजी असल्याने काही नागरिकांच्या कपड्यावर उतरली होती. मंत्र्याकडे समस्या मांडण्याहेतू दाखल झालेल्या महिला पुढे हुज्जत घालण्याच्या मुडमध्ये आल्यानंतर त्याना आवरण्यासाठी पोलीसांकडे महिला पोलीस कर्मचारीच नव्हते. तसेच दिव्यांगासाठी नावनोंदणी केल्यानंतर ताटकळत उभे राहण्याची वेळ आल्यामुळे राजकीय लागेबंधे असलेले मंत्र्याशी हितगुज करण्यात मग्न तर समस्या असलेले ग्राहक व नागरिक मंत्र्यांशी थेट संवाद साधण्याऐवजी बाहेर उभे अशी संतापजनक परिस्थिती काल फोंड्यातील नागरिकांनी अनुभवली. त्यामुळे पुढीलवेळी राजीव गांधी कला मंदिर अशा ठिकाणी आयोजन करावे असे प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी दिली.
कुर्टीत उभारणार महसुल भवन; फोंडा स्मार्ट सिटी
दरम्यान नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी मंत्र्याशी समस्या मांडताना शापूर फोंडा येथे स्थलांतर केलेले माहितीघर पुन: प्रशासकीय इमारतीत आणावे अशी विनंती केले, त्यासाठी सुमारे रू. 45 लाख खर्च अपेक्षित असल्याचे यावेळी निदर्शनास आले. मामलेतदार कचेरी तिसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महसुल भवन उभारणीसाठी सिल्वानर कुर्टी येथे जागेची पाहणी येत्या दिवसात करण्यात येणार आहे. फोंडा पोलीकेच्या प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यात येईल. त्यात प्रामुख्याने वारखंडे येथील मुक्तीधाम स्मशानभूमीचे 1 केंटी 20 लाख रूपये खर्चून डागडुजी, गोल्डन ज्युबिली प्रकल्प, पालीका बाजार प्रकल्पाना चालना देताना फोंडा स्मार्ट सिटी बनविण्dयाचे उद्दिष्ट्या ठेवण्यात आले आहे. मंत्री मोन्सेरात यांनी प्रथम उपजिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्याशी संवाद साधला. त्यानंतर काही शेतकरी व बागायतदारांना कृषी कार्डाचे वितरण मंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. विविध सरपंचांनी आपल्या पंचसदस्यांसह मंत्र्याच्या भेटीत संक्षिप्तरित्या समस्या मांडल्या. त्यानंतर फोडा पालीकेत धावती भेटीने प्रशासन तुमच्या दारी उपक्रमाची सांगता झाली.