Tarun Bharat

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बेळगाव प्रतिनिधी – वेळेत वेतन द्यावे, केंद्र सरकारने निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करावा,कामगार व सुपरवायझर यांना स्मार्टफोन द्यावे, साहित्याच्या दरामध्ये वाढ करावी. यासह इतर मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. वेळेत वेतन दिले जात नाही, ग्रामपंचायत मधील पीडीओकडे काम द्या म्हणून गेले असता काम नाही असे सांगितले जात आहे. केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या निधीमध्ये कपात केली आहे. त्यामुळे आम्हाला काम मिळणे कठीण झाले आहे. तेव्हा केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेच्या निधीमध्ये वाढ करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एम.जे.जेनेखान, जी.व्ही. कुलकर्णी, सी. ए. खराडे, एल.एस.नाईक ,लिंगाप्पा संगोळी, दिलीप वारके, निवास खोत, प्रवीण नाईकवडी यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

हलग्याच्या शेतकऱयाची आत्महत्या

Patil_p

बस प्रवाशांच्या संख्येत वाढ

Omkar B

सोमवारी ग्रामीण, उत्तर-दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचा प्रचार

Amit Kulkarni

अनगोळ येथे शिवभक्त दाम्पत्य-खेळाडूंचा सत्कार

Amit Kulkarni

विशाल चव्हाण 56 व्या ‘बेळगाव श्री’ किताबाचा मानकरी

Amit Kulkarni

गोवा पर्यटनासाठी जाणाऱया

Patil_p