Tarun Bharat

पडीक जमिनीवर चिंचोणेतील शेतकऱयांनी केली सामुदायिक शेती

प्रतिनिधी /मडगाव

वेळळी मतदारसंघातील चिंचोणे येथील शेतकऱयांनी आम आदमी पक्षाचे स्थानिक आमदार प्रुझ सिल्वा, वेळळी कोमुनिदादचे अध्यक्ष आग्नेल फुर्तादो, फादर जॉर्ज आणि वेळळी विभागीय कृषी विभाग यांच्या सहकार्याने सामुदायिक शेतीला सुरूवात केली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून ही जमीन पडीक होती. आता शेतकऱयांनी पुढाकार घेतल्यामुळे शेतकरी वेळ्ळीत नवीन क्रांती घडवून आणणार आहे, चिंचोणतील शेतजमीन अनेक वर्षांपासून पडीक होती. मात्र, यावषी चिंचोणे येथील शेतकऱयांनी एकत्र येऊन शेती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी विभागाकडे कृषी संबंधीत यंत्रणांचा अभाव असतानाही आम्हाला आवश्यक यंत्रणा त्यांनी उपलब्ध करून दिली, असे आपचे वेळळीतील आमदार प्रुझ सिल्वा यांनी सांगितले.

अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेती खूप महत्त्वाची आहे. आज अनेक युवक या क्षेत्रात येऊ पाहत नाही. वेळळी मतदारसंघात अनेक पडीक जमीनी आहेत. तरुणांनी पुढे येऊन कृषी क्षेत्रात करियर घडवावे, असे आवाहन आमदार श्री. सिल्वा यांनी केले.

Related Stories

फोंडा तालुक्यातील रुग्णांना ‘दिलासा’ नाहीच !

Patil_p

मुरगावात शासकीय कर्मचाऱयांच्या बदल्या व घर दुरूस्तीचे कामे रोखण्याचे प्रकार

Amit Kulkarni

तियात्रिस्ट अन्नोनिओ मोराईस यांची जयंती साजरी

Omkar B

परेड मैदानावरील कचरा 30 दिवसांच्या आत हटवा

Omkar B

रोहन खंवटे यांचा पर्वरी मतदारसंघातून अर्ज दाखल

Amit Kulkarni

मोठ्या कुटुंबांची ‘रेशन कार्डे’ वेगळी करुन देऊ

Amit Kulkarni