कसबा बीड /प्रतिनिधी
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या दूरदृष्टिकोनातून विकासबद्द केलेल्या करवीर संस्थांनामुळे आज शंभर वर्षानंतर हे कोल्हापूर जिल्हा, कला-क्रीडा, पर्यटन आदी सर्व क्षेत्रात समृद्ध झाला आहे. या सर्व बाबीचे श्रेय फक्त आणि फक्त राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांना जाते. महाराजांनी दिलेल्या समतेच्या शिकवणीमुळे कोल्हापुरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गविंदाने राहत आहेत. आपल्या सर्वांचे जीवन समृद्ध करणाऱ्या लोकराजाला त्याच्या स्मृती शताब्दी निमित्त अभिवादन करण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सरसावला आहे.
यामध्ये कसबा बीड भागातील पाडळी खुर्द, कोगे, कसबा बीड, शिरोली दुमाला, चाफोडी या भागातील सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी सर्व संस्थांचे पदाधिकारी तसेच युवक व ग्रामस्थ यांच्या वतीने लोकराजा शाहू महाराजांना सकाळी दहा वाजता शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन करण्यात आले. अशा या दूरदृष्टी राजाला कोटी कोटी प्रणाम.

