Tarun Bharat

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूषखबर! मराठीतून परीक्षा देता येणार,औरंगाबाद खंडपीठाचे राज्य शासनाला निर्देश

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यापुढे होणारी परीक्षा आता मराठीतून देता येणार आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.याचा मोठा फायदा राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे.

न्यायालयात झालेल्या रीट याचिकेत कृषी विभागातील तांत्रिक नोकऱ्यांसाठीच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षेला भाषेचे माध्यम विचारणारा पर्याय दिलेलेला होता. मात्र, मुख्य परीक्षेला भाषेच्या संदर्भाने पर्याय विचारण्यात आलेला नव्हता. परीक्षा इंग्रजीत आणि अभ्यासक्रम शिकला मराठीत या मुद्याच्या आधारे याचिकाकर्त्याने परीक्षाही मराठीत घेण्यासाठी राज्य शासनाला निर्देश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका खंडपीठात दाखल केली होती. त्यावरच न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी ही स्वागत केलं आहे.

न्यायालयाने दिलेले निर्देश नेमके काय आहेत?
भाषा संचालनालयाच्या माध्यमातून या परीक्षा मराठी माध्यमातून कशा होतील याची माहिती द्यावी
प्रत्येक परीक्षा यापुढे मराठीत कशा घेता येतील, याचा पर्याय देऊन मराठी भाषिकांना कसा न्याय मिळेल याची माहिती
अशा दृष्टिकोनातून धोरण ठरवण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश
एमपीएससीने या अनुषंगाने शासनाशी सल्ला मसलत करावे
सोबतच आदेश देताना याचिकाकर्त्याची याचिका जनहित याचिकेत रुपांतरित करण्याचा निर्णय पुढील 3 ऑक्टोबर रोजी येणाऱ्या सुनावणीवेळी घेतला जाईल, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांचं इंग्रजीचं टेन्शन मात्र दूर होणार असंच म्हणता येणार आहे.

Related Stories

दरडग्रस्तांचे पुनर्वसन जलसंपदाच्या क्वार्टर्समध्ये

Patil_p

देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या सव्वा आठ लाखांवर, 71 दिवसांतील निचांकी स्तर

Tousif Mujawar

देशात रुग्णवाढीचा उच्चांक

datta jadhav

माढा नगरपंचायतीवर काँग्रेसच्या ॲड. साठे गटाचे वर्चस्व

Abhijeet Khandekar

Sangli; माझा विजय देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या रणनितीमुळे : खा.धनंजय महाडीक

Abhijeet Khandekar

राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन

Tousif Mujawar