Tarun Bharat

खासदार बृजभूषण सिंहांविरोधात दादर पोलीस ठाण्यात मनसेची तक्रार

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

उत्तरप्रदेशचे भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह (brij bhushan singh) यांच्या विरोधात मनसेच्या दादर मधील मनसे (MNS) पदाधिकारी आणि मनसे जनहीत कक्षाचे वकीलांनी दादर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. तर याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्याबाबत खालच्या भाषेत वक्तव्य केल्यामुळे मनसेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मनसेच्या उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतना त्यांनी, राज ठाकरे यांच्याबाबत खालच्या भाषेत वक्तव्य केल्यामुळे, दोन भाषिकांमध्ये तेढ आणि कायदा सुव्यवस्था बिघडवला जात आहे म्हणुन केल्याचे सांगितले. शिवाय, बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या जनहीत कक्षाच्या वकिलांनी केली आहे.

बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. त्यांना विचारण्यात आलं की राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत काय सांगाल त्यावर ते म्हणाले की, “राज ठाकरेंचा बापही अयोध्येत येऊ शकणार नाही. बिहारचा बक्सर हा असा भाग आहे, जिथे भगवान रामने शक्षा ग्रहण केली होती. विश्वमित्रने लंका अभियानाची योजना इथूनच तयार केली. त्याच धरतीवरून आम्ही अयोध्या आंदोलनासाठी समर्थन मागायला आलोय”, असंही बृजभूषण सिंह म्हणाले होते.

error: Content is protected !!