Tarun Bharat

केतकी चितळे प्रकरण : ‘तुका म्हणे’ शब्दावर देहू संस्थानाला आक्षेप; देहूरोड पोलिसांकडे तक्रार

पिंपरी / प्रतिनिधी :

अभिनेत्री केतकी चितळेने केलेली सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट तिच्या अंगलट आली असून, तिच्याविरोधात ठिकठिकाणी गुन्ह्यांची नोंद केली जात आहे. आता जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहू यांच्या वतीने केतकी चितळेविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. (Complaint against Ketki Chitale on behalf of Sant Tukaram Maharaj Sansthan Shrikshetra Dehu)

देहू संस्थानच्या वतीने देहूरोड पोलिसांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ‘तुका म्हणे’ या शब्दांचा वापर केला आहे. या शब्दांचा वापर करून वादग्रस्त आणि विटंबनात्मक लेखन केले आहे. श्री संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे पूजनीय श्रद्धास्थान आहे. ‘तुका म्हणे’ ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगांची ती स्वाक्षरी आहे.

श्री संत तुकाराम महाराजच नव्हे; तर देशातील सर्व संतांच्या नावाचा वापर करून जर कोणी असे वादग्रस्त आणि विडंबनात्मक लिखाण करत असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

‘तुका म्हणे’ ही नाममुद्रा; चुकीच्या पद्धतीने वापर नको

जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष हभप. नितीन मोरे म्हणाले, ‘तुका म्हणे’ ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा आहे. चुकीच्या पद्धतीने तिचा वापर करू नका. संत, राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत जर कोणी चुकीचे वक्तव्य, लेखन केले; तर सरकारने कोणीतरी एफआयआर देण्याची वाट पाहू नये, तात्काळ कारवाई करावी. कोणत्याही संतांच्या, महापुरुषांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य, लेखन करणे चुकीचे असल्याचेही अध्यक्ष मोरे यांनी सांगितले.

Related Stories

दसऱ्यानंतर स्वराज्य संघटनेचा राज्यभर दौरा; संभाजीराजेंची माहिती

Archana Banage

फडणवीसांच्या आरोपांचे अनिल देशमुखांनी केले खंडण

Archana Banage

शुल्क परतावा न दिल्यास विद्यापीठ, महाविद्यालयांवर कारवाई, UGC चा इशारा

datta jadhav

शासनाने घालून दिलेले नियम मोडल्यास खैर नाही – पो. नि. गिरीगोसावी

Archana Banage

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ कारणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला फोन

Archana Banage

गोविंद पानसरे खूनखटला; सुनावणी ५ ऑगस्ट रोजी , सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश

Kalyani Amanagi