क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
केबिन हॉल गंगावती, कोप्पळ येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये बेळगावच्या कम्प्लिट कराटे अकादमीच्या कराटेपटूंनी सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.
ड्रीम वर्ल्ड मार्शल आर्ट टेनिंग यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी भारतातून विविध राज्यातील 1200 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. तसेच बेळगावच्या कम्प्लिट कराटे अकॅडमीच्या खेळाडूनी विविध गटात विजेतेपद मिळविले. विजेत्या कराटेपटूंना प्रमुख पाहुणे कर्नाटक स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे जनरल सेपेटरी भार्गव रेड्डी व जबी वल्ला यांच्या हस्ते प्रथमच कम्प्लिटचे कराटेपटू व जितेंद्र काकतीकर यांना चषक देण्यात आले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कराटे मास्टर जितेंद्र काकतीकर, रमेश अलगुडेकर, अक्षय प्रभुजी यांचे मार्गदर्शन लाभले.