सातारा, सांगली, कोल्हापूरसह इतर राज्यातही घरफोडय़ा
गौरी आवळे/ सातारा
वयाच्या 7 व्या वर्षी त्याने गुन्हेगारी विश्वास पाऊल ठेवले. छोटय़ा चोऱया करत त्याने घरफोडय़ा करण्यास सुरूवात केली. एक एक असे वयाच्या 28 वर्षापर्यंत त्याने घरफोडय़ाचे शतक पूर्ण केले आहे. लोकेश रावसाहेब सुतार असे आरोपीचे नाव आहे. तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने बिबवेवाडी पुणे येथे केलेल्या घरफोडीच्या गुह्यात तो जेरंबद आहे.
लिंगनूर (ता. मिरज जि. सांगली) हे लोकेश सुतार यांचे मुळ गाव आहे. लहानपणी मुले शिक्षणाचे धडे गिरवतात. पण लोकेश याने गुन्हेगारीचे धडे गिरवायला सुरूवात केली. छोटय़ा चोऱया करत तो घरफोडय़ा करू लागला. सांगली जिह्यातून त्याने घरफोडय़ा करायला सुरूवात केली. सांगलीत त्याने 22 घरफोडय़ा केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. घरफोडी गुह्यात तो सापडला की जमीन मिळून पुन्हा बाहेर असे सत्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. जसा तो वयाने मोठा होत गेला. तसा सांगली सह सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बारामती, पुणे ग्रामीण या जिह्यात त्याने घरफोडय़ा केल्या आहेत. प्रत्येक जिह्यातील पोलीस रेकॉर्डवरील तो गुन्हेगार आहे. महाराष्ट्रासह त्याने कनार्टकमध्ये ही घरफोडय़ा केल्या आहेत. आता तो 28 वर्षाचा झाला असून त्याने घरफोडय़ाचे शतक पूर्ण केले आहे. त्याने सातारा शहर, तालुका व उंब्रज, लोणंद व इतर तालुक्यात घरफोडय़ा केल्या आहेत.
लोकेश पुणे पोलिसांच्या ताब्यात
9 ते 11 सप्टेंबर दरम्यान, पुण्यातील बेबवेवाडी येथील रम्यनगरी सोसायटीत राहणारे फिर्यादी हे फ्लॅट कुलूप बंद करून गावी गेले होते. यावेळी त्यांचा फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने चोरून नेले. या चोरीचा गुन्हा दाखल होताच बिबवेवाडी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. या परिसरातील 90 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीचे नाव व पत्ता प्राप्त केला. ही चोरी रेकॉर्डवरील सराईत अट्टल दिवसा घरफोडी करणारा गुन्हेगार लोकेश सुतार याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद करुन त्याच्याकडून 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. 3 लाख रूपये किंमतीचे 6 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 10 लाखांची चारचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
बंद घर दिसले की फोडणारच
लोकेश हा फक्त रात्री नव्हे तर दिवसाही घरफोडी करतो. घर बंद दिसले की, कडी कोयंडा काढून आता प्रवेश करायचा आणि सोने, चांदीच्या वस्तू इतर साहित्य चोरून न्यायचे हा त्याचा व्यवसाय झाला आहे. त्याच्यावर प्रत्येक जिह्यात व राज्यात फक्त घरफोडीचेच गुन्हे दाखल आहेत. तो जामीनावर बाहेर आला तरी पुन्हा घरफोडी करणारच अशी गुन्हेगारी वृत्ती त्यांने अंगीकारली आहे.