Tarun Bharat

देवलत्ती महालक्ष्मी यात्रोत्सवाची सांगता

शेवटच्या दिवशी हजारो भाविकांची उपस्थिती

वार्ताहर /खानापूर

तालुक्यातील देवलत्ती येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सवाची बुधवारी हर हर महादेवच्या तसेच भंडाऱयाच्या उधळणीत सांगता झाली. देवलत्ती येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा 26 वर्षांनंतर भरविण्यात आली होती. मंगळवार दि. 12 रोजी पहाटे देवीचा विवाह सोहळा झाल्यानंतर यात्रेला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंगळवार दि. 12 व बुधवार दि. 13 असे दोन दिवस देवीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी 5 वाजता देवी गदगेवर विराजमान झाली होती. त्यानंतर दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
हेते.

रविवारी व सोमवारी दोन दिवस कुस्त्यांचे आयोजन केले होते. त्यानंतर दररोज रात्री गावात नाटय़प्रयोग आयोजिण्यात येत होता. गेल्या आठ दिवसात वादळी पावसामुळे भाविकांची मात्र तारांबळ उडाली होती. बुधवारी शेवटच्या दिवशी दुपारी 4 वाजता देवी गदगेवरून निघाली. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. त्यानंतर सवाद्य मिरवणुकीने देवीने सीमेकडे प्रस्थान केले.

Related Stories

5 लाख महिलांच्या खात्यावर जनधनची रक्कम जमा

Patil_p

मराठा बँकेवर सत्ताधारी पॅनलची सत्ता

Patil_p

स्मार्ट सिटीची सुरू असलेली कामे तातडीने करा

Amit Kulkarni

किस्ना डायमंड फेस्टिव्हलला थाटात प्रारंभ

Amit Kulkarni

वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ

Omkar B

बेळगावमधील शिवभक्त तरुणांवरील राजद्रोहाचे गुन्हे मागे घ्या

Abhijeet Khandekar