प्रतिनिधी/ बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना चैत्र पौर्णिमेदिवशी पुण्यतिथीनिमित्त शहापूर येथील शिवाजी उद्यान येथे आदरांजली वाहण्यात आली. शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील व विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
सगळीकडे हनुमान जयंती साजरी होत असताना चैत्र पौर्णिमेच्या भर दुपारी छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून निघून गेले. याची जाणीव हिंदू समाजाला राहावी, या उद्देशाने शिवप्रति÷ानकडून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिवमूर्तीला अभिषेक करून झाली. ध्येयमंत्र, आरती व प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. यावेळी अनंत चौगुले, अंकुश केसरकर, गजानन निलजकर, प्रमोद चौगुले, अर्जुन शिंदे, उदीत रेगे, विजय कुंटे, राम सुतार, अतुल केसरकर, शंकर भातकांडे, नितीन कुलकर्णी, ओमकार पुजारी, मारुती पाटील, सदानंद मजुकर, अमित पेडणेकर, गौरी गवाणे यांसह शिवभक्त उपस्थित होते.