Tarun Bharat

महापौर-उपमहापौर निवडणूक तातडीने घ्या

प्रादेशिक आयुक्त-मनपा प्रभारी कौन्सिल सेपेटरींना अपक्ष नगरसेवकांचे साकडे : निवडणुकीची घोषणा करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

महापालिका निवडणुका होऊन वर्ष होत आले. तरीपण अद्याप महापौर-उपमहापौर निवड करण्यात आली नाही. त्यामुळे नगरसेवकांचे काय चालले आहे? असा मुद्दा नागरिक करीत आहेत. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याच्यादृष्टीने  महापौर-उपमहापौर निवडणूक तातडीने घेऊन नगरसेवकांना अधिकार देण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन नगरसेवकांच्यावतीने प्रादेशिक आयुक्त आणि महापालिका सामान्य प्रशासन उपायुक्तांना देण्यात आले.

महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन यापूर्वी देण्यात आले होते. निवेदन देऊन दीड महिना झाला तरी याबाबत प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी यापूर्वीच आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पण निवडणुकीची घोषणा करण्यात आली नाही. परिणामी नगरसेवकांची निवड होऊन वर्ष झाले तरी अधिकार देण्यात आले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निवारण करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नसल्याने संताप व्यक्त करून नगरसेवक काय करीत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याच्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्याकरिता लोकनियुक्त सभागृह स्थापन करणे आवश्यक आहे. महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यात यावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. जर निवडणूक घेण्यास विलंब झाल्यास नागरिकांकडून आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे याचा विचार करून प्रशासनाने लवकर निवडणुकीची घोषणा करावी, अशा मागणीचे निवेदन नवनिर्वाचित अपक्ष नगरसेवकांच्यावतीने प्रादेशिक आयुक्त आणि महापालिकेच्या सामान्य प्रशासन उपायुक्त व प्रभारी कौन्सिल सेपेटरी भाग्यश्री हुग्गी यांना देण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित अपक्ष नगरसेवक उपस्थित होते.

Related Stories

खानापुरात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद

Tousif Mujawar

अनधिकृत वसाहती अधिकृत करा

Omkar B

बेळगाव जिल्हय़ाने द्विशतक गाठले

Patil_p

खानापूर मोक्षधाम मार्गावर पेव्हर्सकामाला सुरुवात

Amit Kulkarni

विविध ठिकाणी मराठी भाषादिन साजरा

Amit Kulkarni

काजू उत्पादनात घट होण्याची चिंता

Amit Kulkarni