Tarun Bharat

बर्फ, वाळू, समुद्राचा संगम

जगभरात व्हायरल झाले छायाचित्र

देशविदेशात भटकंती करणारे लोक अनेकदा नव्या ठिकाणी किंवा निसर्गाच्या सान्निध्यात राहणे पसंत करतात. एकीकडे अशा लोकांना पर्वतीय क्षेत्रात होणारी हिमवृष्टी आकर्षित करते, तर काही जणांना समुद्रकिनाऱयावर मजा करायची असते. याचदरम्यान काही जणांना वाळवंटातील वाळूत अनेक तास चालत राहणे आवडत असते.

सध्या या तिन्ही ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना अनेकदा वेगवेगळय़ा ठिकाणांचा प्रवास करावा लागू शकतो. तर जगात एक अशी जागा आहे, जेथे वाळवंटाच्या वाळूपासून समुद्रकिनारा, पर्वत आणि हिमवृष्टी पाहता येते. बर्फ, वाळू आणि समुद्र किनाऱयाचा संगम जपानमध्ये पाहता येतो.

इन्स्टाग्रामवर छायाचित्रकार हिसा यांनी एक छायाचित्र शेअर केले आहे. या छायाचित्रांना सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. या छायाचित्रात एकीकडे उंच पर्वतांवर हिमाच्छादन दिसून येत आहे, तर दुसरीकडे समुद्रासह वाळूचे मैदानही दिसते. हे अनोखे छायाचित्र सोशल मीडियावर येताच वेगाने व्हायरल होत आहे. छायाचित्रातील पर्वतांवर होणारी हिमवृष्टी आणि समुद्राचा वाळूयुक्त किनारा सर्वांनाच आकर्षित करत आहे.

ग्लोबल जियोपार्क

हे छायाचित्र समोर येताच जपानमध्ये हे ठिकाण कुठे असा प्रश्न प्रत्येक जण विचारत आहे. ही दुर्लभ घटना सॅनइन कॅगन जियोपार्कमध्ये पाहिली जाऊ शकते असे उत्तर काही युजर्सनी दिले आहे. याला 2008 मध्ये जपानी जियोपार्क तर 2010 मध्ये युनेस्कोने ग्लोबल जियोपार्क घोषित केले होते.

Related Stories

समुद्रात सापडला पंख असलेला मासा

Patil_p

8 अनोख्या अटींसह जोडप्याचा विवाह

Patil_p

कामाचे स्वातंत्र्य, सक्रियतेमुळे मिळते सकारात्मक ऊर्जा

Amit Kulkarni

वाचन संस्कार हा ज्ञानदानाचाच संस्कार : न.म.जोशी

prashant_c

दीड कोटीचे ‘बार्बी हाउस’

Patil_p

जगातील 7.70 लाख लोकांनी पहिली ऑनलाईन ‘पेंग्विन‌ परेड’

Tousif Mujawar