प्रतिनिधी/ खेड
परतीला निघालेल्या चाकरमान्यांमुळे कोकण मार्गावरून धावणाऱया नियमित गाडय़ांसह गणपती स्पेशल गाडय़ा तिसऱया दिवशीही विक्रमी गर्दीने अन् विलंबाने धावल्या. मुंबईच्या दिशेने जाणाऱया रत्नागिरी-दिवा पॅसेंजरमध्ये येथील स्थानकात तिष्ठत बसलेल्या प्रवाशांना प्रवेशच न मिळाल्याने गोंधळ घातला. राज्य राखीव दलाच्या पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी चाकरमान्यांची समजूत घातली. स्थानकात खोळंबलेल्या चाकरमान्यांना जामनगर व मंगला एक्स्प्रेस या जलद गाडय़ांमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आल्याने चाकरमानी शांत झाले.
गणरायाला निरोप दिल्यानंतर चाकरमानी परतीला निघाले आहेत. कोकण, मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी 300 हून अधिक फेऱया सोडून चाकरमान्यांच्या मार्गातील अडथळे दूर केले असले तरी सर्वच रेल्वेगाडय़ा गर्दीने धावल्या. परतीच्या प्रवासातही हिच परिस्थिती कायम असून येथील स्थानकात दाखल होणाऱया रेल्वेगाडय़ांमध्ये प्रवेश मिळवताना गणेशभक्तांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. स्थानकात दाखल होणाऱया रेल्वेगाडय़ा आधीच हाऊसफुल्ल होवून येत असल्याने येथील स्थानकात आल्यावर गाडय़ांचे दरवाजेच उघडले जात नसल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होत आहे.
मंगळवारी येथील रेल्वेस्थानकात मुंबईला जाणाऱया प्रवाशांची गर्दी उसळली होती. रत्नागिरी-दिवा पॅसेंजर येथील स्थानकात दाखल होताच एन्ट्री मिळवण्यासाठी प्रवाशांची चढाओढच सुरू झाली. मात्र गर्दीमुळे या पॅसेंजरमध्ये येथील स्थानकात तिष्ठत बसलेल्या प्रवाशांना प्रवेशच न मिळाल्याने गोंधळ घालण्यास सुरूवात केली. राज्य राखीव दलासह स्थानिक पोलिसांनी प्रवाशांना आतमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्नही केला. मात्र तुफानी गर्दीमुळे येथील स्थानकात खोळंबलेल्या प्रवाशांना आतमध्ये चढताच आले नाही. सरतेशेवटी कोकण मार्गावरून धावणाऱया जामनगर एक्स्प्रेसला येथील स्थानकात थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जामनगर एक्स्प्रेसच्या इंजिनपासून 10 डबे सोडून उर्वरित डब्यातून पनवेलपर्यंत प्रवास करण्याची मुभा देण्यात आल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला. या पाठोपाठ मंगला एक्स्प्रेसलाही येथील स्थानकात थांबा देण्यात आल्याने गर्दी कमी होवून चाकरमान्यांना मुंबई गाठणे सुकर झाल्याने साऱयांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. सर्वच रेल्वेगाडय़ा गर्दीने धावत असल्याने जादा पोलिसांसह राज्य राखीव दलाचेही जवान जागता पहारा देत आहेत.
हापा–मडगाव एक अतिरिक्त डब्याची धावणार
कोकण मार्गावरून धावणाऱया रेल्वेगाडय़ांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी हापा-मडगाव एक्स्प्रेसला 1 स्लिपर डबा वाढवण्यात आला आहे. 22908/22907 क्रमांकाची हापा-मडगाव एक्स्प्रेस 7 व 9 सप्टेंबर रोजी एका अतिरिक्त डब्याची धावणार असल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.