प्रतिनिधी /खानापूर
राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात अध्यपक्षदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून पदभार स्वीकारला. खानापूरच्या काँग्रेस आमदार अंजली निंबाळकर यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर त्यांनी मल्लीकार्जुन खर्गे यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या. यावेळी कर्नाटकातील अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते.