Tarun Bharat

सांखळी एसटी समाजाकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

Advertisements

सांखळी/ प्रतिनिधी

 आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची राष्ट्रपतीपदासाठी शिफारस करून आदिवासी समजातील महिला तसेच समस्त गोमंतकीय व देश पातळीवर एसटी आदिवासी व दुर्लक्षित समाजाला बहुमान प्राप्त करून दिल्याबद्दल सांखळीतील समाज बांधवानी मुख्यमत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच आमच्या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोचवा असे आवाहन केले.

यावेळी पाळीच्या माजी सरपंच प्रशिला गावडे, समाज प्रतिनिधी रोहिदास कानसेकर, प्रदीप गावडे, महिला नेत्या स्वाती मायनीकर व इतर महिला उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी निवडून मोठा बहुमान दिला आहे. तसेच त्यांचा अर्ज सादर करताना अनुमोदन देण्याची संधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लाभली. संपूर्ण आदिवासी समाजासाठी ही गौरवशाली घटना असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.

Related Stories

एलआयसीकडून कॅन्सर संस्थेला मोबाईल व्हॅन प्रदान

Amit Kulkarni

निकालापूर्वीच काँग्रेस उमेदवारांना ऑफर्स

Patil_p

उघडय़ावर कचरा फेकणाऱयांविरूध्द मुरगाव पालिकेची दंडात्मक कारवाई

Amit Kulkarni

दिल्ली-मडगाव रेल्वे 15 पासून धावणार

Omkar B

काणकोणात 45 वर्षांवरील पूर्ण लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज

Omkar B

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा अनोखा उपक्रम

Amit Kulkarni
error: Content is protected !!