ऑनलाईन टीम/ तरुण भारत
काँग्रेस आज महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशभरात आंदोलन करणार आहे. (Congress attack on inflation-GST) राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तर पंतप्रधान भवनालाही घेराव घालण्याची काँग्रेसची योजना आहे. दरम्यान, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली देशभरात आंदोलन होणार आहे.
दरम्यान, महागाई, बेरोजगारी आणि इतर प्रश्नांवर काँग्रेस आज देशव्यापी आंदोलन करणार आहे. दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांची चौकशी केल्यानंतर काँग्रेस केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहे. पावसाळी अधिवेशनातही काँग्रेस सरकारला सातत्याने घेराव घालत आहे.
दिल्लीत पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. अकबर रोडवर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. तर काँग्रेस कार्यकर्ते पक्ष कार्यालयाजवळ येण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी जंतर-मंतर वगळता नवी दिल्ली जिल्ह्यातील संपूर्ण परिसरात कलम १४४ लागू केले आहे.
हे ही वाचा : वर्षा राऊतांची होणार ईडी चौकशी, ११ वाजता कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस पक्षातर्फे हे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. महागाईचा मोठा निषेध म्हणून पक्षाने संसद ते राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान भवनापर्यंत मोर्चा काढणार आहे. देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पंतप्रधान भवनाला घेराव करण्याची योजना आखली आहे. काँग्रेसच्या या मोर्चाला पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
लष्कराची अग्निपथ योजना, वाढती महागाई, बेरोजगारी, वाढती जीएसटी आणि कंत्राटी पद्धतीच्या विरोधात काँग्रेसने आंदोलन पुकारलं असून जोपर्यंत सरकार कोणताही दिलासा देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी म्हटले आहे.