Tarun Bharat

कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबरला; कन्याकुमारी ते काश्मीर 3,500 किमीची यात्रा

Advertisements

राहुल गांधी करणार यात्रेचे नेतृत्व

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काँगेसची ‘भारत जोडो’ यात्रा आता 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 12 राज्यांमध्ये पोहोचणाऱया या यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करणार आहेत. यापूर्वी ही यात्रा महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्राr यांच्या जयंतीवेळी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी सुरू होणार होती. काँग्रेसच्या अध्यक्षाची निवडणूक देखील 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरदरम्यान होणार आहे.

काँगेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आयोजित होणार आहे. पूर्णपणे पायी आयोजित होणारी ही यात्रा 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. 150 दिवसांपर्यंत चालणारी पदयात्रा सुमारे 3500 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. या यात्रेत पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत.

 भय, कट्टरता आणि पूर्वग्रहाचे राजकारण आणि उपजीविका हिरावून घेणारी आर्थिक धोरणे, वाढती बेरोजगारी आणि वाढत चाललेल्या विषमतेला दूर करण्याचा पर्याय प्रदान करण्याच्या या विशाल राष्ट्रीय प्रयत्नाचा हिस्सा होऊ इच्छिणाऱया सर्व लोकांना ‘भारत जोडो’ यात्रेत सामील होण्याचे होण्याचे आवाहन काँग्रेस करत असल्याचे पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

80 वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांचे नेतृत्व आणि प्रेरणेतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू केले होते. याच आंदोलनाने 5 वर्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचे जयराम रमेश यांनी नमूद केले आहे.

Related Stories

“आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी साक्षीदाराचा दावा धक्कादायक”

Archana Banage

केंद्राप्रमाणे शहामृगी पवित्रा घेऊ शकत नाही!

Patil_p

बीरभूम हिंसाचाराचा सीबीआय तपास सुरू

Patil_p

मिस्त्रींना धक्का, टाटांना दिलासा

Patil_p

गरिबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज : निर्मला सीतारामन

tarunbharat

13 वर्षांनी पृथ्वीवर परतला भारताचा ‘हेर’

Patil_p
error: Content is protected !!