ऑनलाईन टिम नवी / दिल्ली
५ ऑगस्ट रोजी कॉंग्रेसने महागाई आणि बेरोजगारी विरोधात देशभर आंदोलने केली. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रिय कॉंग्रेसने नागरिकांचे आणि सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ब्लॅक फ्रायडे प्रोटेस्ट नावाने सुरू केलेल्या या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिका केली आहे. राष्ट्राला संबोधून केलेल्या आपल्या भाषणात त्यांनी कॉंग्रेस काळी कपडे घालून ‘काळी जादू’ करत असल्याचा आरोप करत पक्ष चालवण्यासाठी कॉग्रेसच्या या जादूचा काहीही उपयोग होणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
पावसाळी अधिवेशन चालू असताना कॉग्रेसने महागाई आणि बेरोजगारी विरोधात देशभर ब्लॅक फ्रायडे नावाचे आदोलन चालवले. या आंदोलनात कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी सक्रिय झाल्याचे दिसत होत्या. श्रीमती गांधीसह राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ही आंदोलन तापवण्याचा प्रयत्न केला. या आंदोननामुळे दिल्लीतील राजकिय वातावरण गरम झाल्याचे दिसून आले. पण या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिका केली आहे.
काल देशाला संबोधित करताना त्यांनी कॉंग्रसच्या या आंदोलनावर टिका केली आहे. कॉंग्रेसचे नेते काळ्या आंदोलनाच्या नावाखाली काळे कपडे घालून काळी जादू करत असल्याचा आरोप त्यानी केला. कॉंग्रेस पक्षातील नेत्यांनी चालवलेल्या या काळ्या जादूने त्यांचा पक्ष वाचवू शकत नाही. कॉंग्रेस असा प्रयोग करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.