राज्यतील घवघवीत यशानंतर हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस नेत्यांनी राज्याचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची शिमला येथे भेट घेतली. राज्यात सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ त्यांच्याकडे असल्याची काँग्रेस आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने घवघवीत यश मिळवले आहे. भाजपला जरी या राज्यात पराभवाचा सामना करावा लागला असला तरी तिथे ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्यासाठी भाजप श्रेष्ठी नवीन आखाडे बांधत आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश मधील वाढत्या राजकिय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांनी सत्तेसाठी जोरदार सुत्रे हलवून राजपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेसाठी दावा केला. हिमाचल प्रदेश काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला, पक्षाचे निरीक्षक भूपेश बघेल आणि बीएस हुड्डा यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली.

