ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बुलढाण्यात शिंदे गटाने काँग्रेसला खिंडार पाडले आहे. मोताळा नगरपंचायतीमधील उपनगराध्यक्षांसह काँग्रेसच्या आठ दिग्गज नगरसेवकांनी आ. संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेसला खिंडार पाडत नगरसेवकांना आपल्या पक्षात खेचणाऱ्या आ. संजय गायकवाड यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून अभिनंदन केलं. तसेच या नगरसेवकांच्या वॉर्डातील विकासकामांसाठी नगरविकास खात्यामार्फत निधी देण्याचेही आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, मोताळामध्ये झालेल्या या पक्षप्रवेशाचा विधानपरिषद निवडणूक मतदानावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा : खंबाटकी बोगद्यात भीषण अपघात; 2 जागीच ठार, 5 जखमी