Tarun Bharat

उत्तर गुजरातमध्ये काँग्रेस वरचढ

पक्षाकडून जोरदार प्रचार

गुजरातच्या मागील दोन विधानसभा निवडणुकांदरम्यान राज्याच्या उत्तर भागात काँग्रेसने भाजपपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे. उत्तर गुजरातमध्ये एकूण 32 जागा आहेत. काँग्रेस यंदाच्या निवडणुकीतही स्वतःची आघाडी कायम ठेवू पाहत असून काही घटक पक्षाकडून अनुकूल ठरले आहेत. उत्तर गुजरातमध्ये 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

डेअरी सहकारी नेते आणि माजी गृहमंत्री विपुल चौधरी यांना अटक झाल्याने भाजपला काही मतदारसंघांमध्ये विरोधाला सामोरे जावे लागत आहे. ओबीसी अन् चौधरी समुदायात या कारवाईमुळे नाराजी असल्याची चर्चा आहे. तसेच स्थानिक जातीय समीकरणे तसेच उमेदवारांची निवड प्रक्रिया या निवडणुकीचा निकाल ठरविणार आहे.

उत्तर गुजरातमध्ये बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरावली आणि गांधीनगर हे जिल्हे असून यात 32 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. काँगेसने 2012 आणि 2017 या दोन्ही निवडणुकांमध्ये उत्तर गुजरातमधील 17 जागांवर विजय मिळविला होता. तर दुसरीकडे भाजपला 2012 च्या निवडणुकीत 15 तर 2017 च्या निवडणुकीत 14 जागांवर यश मिळाले होते. मागील निवडणुकीत एका मतदारसंघात (वडगाम राखीव) अपक्ष उमेदवार जिग्नेश मेवाणी यांचा विजय झाला होता. मेवाणी हे आता काँग्रेस पक्षात दाखल झाले आहेत.

विद्यमान आमदारांवर दाखविला विश्वास

विरोधी पक्ष काँगेसने या क्षेत्रातील स्वतःच्या बहुतांश आमदारांवर विश्वास दाखविला आहे. पक्षाने 11 आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर भाजपने स्वतःच्या 14 विद्यमान आमदारांपैकी केवळ 6 जणांना तिकीट दिले आहे. उर्वरित मतदारसंघांमध्ये नव्या चेहऱयांना संधी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी स्थानिक जातीय समीकरणे विचारात घेत पाटीदार आणि कोळी समुदायाला उमेदवारीत अधिक प्रतिनिधित्व दिले आहे.

Related Stories

मराठा आरक्षण : राज्यांना अहवालासाठी आठवडय़ाची मुदतवाढ

Patil_p

पँगाँग भागात चीन उभारतोय पूल

Abhijeet Khandekar

‘कर्तव्यपथ’च्या रुपाने आज ऐतिहासिक क्षण

Amit Kulkarni

राजपथावर देशाच्या सांस्कृतिक आणि सामर्थ्याचे भव्यदिव्य दर्शन

Archana Banage

युद्धस्मारक ठिकाणी हुतात्मा पित्याला वाहिली श्रद्धांजली

Patil_p

सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा उद्या जाहीर होणार

datta jadhav