Tarun Bharat

विधान परिषद सभागृह नेतेपद शिवसेनेला दिल्याने काँग्रेस नाराज; अशोक चव्हाण म्हणाले, “न विचारताच…”

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राज्यात शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यांनतर मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे अनेकजण नाराज झाले आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षातील महाविकासआघाडीतही नाराजीनाट्य सुरू आहे. विधान परिषदेतील सभागृह नेतेपद शिवसेनेला (Shivsena) देण्याचा निर्णय झाल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यावर काँग्रेसचे (congress) नेते आणि आमदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाला विधान परिषदेत सभागृह नेतेपदाचं, विरोधी पक्षनेतेपदाचं स्थान मिळायला हवं होतं. मात्र, चर्चा न होताच परस्पर हा निर्णय झाला आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

मंत्रिमंडळात एकाही महिला स्थान देण्यात आलेलं नाहीये. यावरून विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यावर देखील महिलांना संधी न दिल्याच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केलं. मंत्रिमंडळ कुणाचंही असो, महिलांना सक्षम करणं आणि प्रतिनिधित्व देणं गरजेचं आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

हे ही वाचा : राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी पून्हा लांबणीवर

दरम्यान, राज्यातील सत्ता गमावल्यानंतर शिवसेनेने विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी हालचालींना सुरुवात केली होती. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर मराठवाड्यातील शिवसेना नेते अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची वर्णी लावण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सभापतींना पत्र पाठवले होते.

यावर अशोक चव्हाण म्हणाले, “काँग्रेस पक्षाला विधान परिषदेत सभागृह नेतेपदाचं, विरोधी पक्षनेतेपदाचं स्थान मिळालयला हवं होतं. मात्र, चर्चा न होताच परस्पर हा निर्णय झाला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे काँग्रेसमध्ये याची प्रतिक्रिया आहे.”

Related Stories

राज्यात दोन दिवसात कोरोनाचे 80 रुग्ण

Patil_p

मुंबई महापालिकेचं ठरलं, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणालाच नाही!

Archana Banage

गोकुळमध्ये सत्तांतर! सतेज पाटील-मुश्रीफ गटाची 17-4 ने बाजी

Abhijeet Shinde

शस्त्रक्रिया परवानगीवरून आयएमए आणि आयुष कृती समिती आमने सामने

Rohan_P

चाकूने भोसकलेल्या युवकाचा मृत्यू

Patil_p

बिहारचा शुभम कुमार युपीएससीमध्ये अव्वल

Patil_p
error: Content is protected !!