Tarun Bharat

…तर मी हेलिकॉप्टरने कन्याकुमारीला गेलो असतो; राहुल गांधींची खोचक टीका

ऑनलाईन टीम/तरुण भारत

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वाखाली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील हिंगोलीमध्ये (Hingoli) सध्या राहुल गांधी पायी चालत सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. दरम्यान हिंगोलीत राहुल गांधी यांनी आज सभेला संबोधित करताना केंद्रातील मोदी सरकारच्या काळात निश्चलनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. वस्तू व सेवाकरही लागू करण्यात आला. या दोन्ही निर्णयाचा फटका शेतकरी, छोटे व्यापारी व सर्वसामान्य, अशा या सर्वानाच बसला असल्याचे सांगत खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर (Prime Minister Narendra Modi) खोचक टीका केली आहे. तसेच पंतप्रधानांसारखं मी डायरेक्ट हेलिकॉप्टरने कन्याकुमारीला गेलो असतो, यानंतर हेलिकॉप्टरने कन्याकुमारीहून श्रीनगरला जाऊन ध्वज फडकवतं म्हणू शकलो असतो भारत जोडो… असा टोला राहुल गांधी यांना लगावला आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळात देशात बेरोजगारी, महागाई वाढली आहे. त्याविरोधात काँग्रेसने ‘‘भारत जोडो’’ यात्रा काढली आहे. कन्याकुमारीपासून निघालेली भारत जोडो यात्रा कश्मीपर्यंत जाणार आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून भारताचा ध्वज जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जाऊ फडकवणार आहे. देशाचे तुकडे होण्यापासून थांबवणे, विषमता किंवा तिरस्काराची भावना कमी करणे, आणि हिंसाचार थांबवणे हे यात्रेचे लक्ष्य आहे. दरम्यान, अनेकांनी सवाल केला की, यासाठी यात्रेची काय गरज होती? आज काल करतात तसं, डायरेक्ट हेलिकॉप्टरने कन्याकुमारी जाऊन, तिथे भाषण करायचं, जसं पंतप्रधान करतात. ज्यानंतर हेलिकॉप्टरने कन्याकुमारीहून श्रीनगरला जात ध्वज फडकवतं सांगू शकलो असतो भारत जोडो… पण यातून फायदा होणार नाही.

Related Stories

सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या, चौघा विरुद्ध गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

भुशी धरणात मुंबईचा पर्यटक बुडाला, शोध सुरू

datta jadhav

मध्यप्रदेशात शिवराज सरकार तरणार!

Patil_p

सोनिया गांधींना इस्पितळातून डिस्चार्ज

Patil_p

चोरून दारुविक्री करणारा जगन्नाथ पवार ताब्यात

Patil_p

महाराष्ट्रात कोरोना चाचणी आता आणखी स्वस्त!

Tousif Mujawar