Tarun Bharat

‘पीएफआय’चा फायदा भाजपलाचं; सचिन सावंतांचा आरोप

Advertisements

Sachin Sawant On BJP : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) देशभरात छापे टाकत आहे. आतापर्यंत पीएफआयशी संबंधित १०६ लोकांनाही अटक करण्यात आली आहे. या कारवाई विरोधात शनिवारी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएफआयच्या सदस्यांनी आंदोलनं केली. या आंदोलनाच्या वेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पीएफआयचा फायदा भाजपलाच होतो आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी ट्विट करत केला आहे.

काय म्हणाले सचिन सावंत

पीएफआयवर भाजपा सरकारनं अजून बंदी का घातली नाही? भाजपाच्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी पुरावे आहेत हे जाहीर केलं होतं. भाजपाशासित पुणे महापालिकेनं पीएफआयला कोरोना काळात दफनविधीची जबाबदारी का दिली होती? पोलिस ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणाल्याची पुष्टी का करत नाहीत? भाजपालाच पीएफआयचा फायदा होतो असं ट्विट सावंतांनी केलंय.

Related Stories

सांगली : बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडले

Archana Banage

सातारा नगरपालिका निवडणूक मनसे लढविणार

Patil_p

बंडातात्यासाठी आ.महेश शिंदे वारकरी वेशात रस्त्यावर

Patil_p

अनिल देशमुखांविरोधात माफीचा साक्षिदार करा- सचिन वाझे

Kalyani Amanagi

चातुर्मासानिमित्य जैन साधु – सांध्वींना प्रवासाला परवानगी

Archana Banage

महाराष्ट्र : कोरोनाबाधितांनी ओलांडला 20.13 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar
error: Content is protected !!