वृत्तसंस्था/ बिलासपूर
हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे माजी आमदार बांबेर ठाकूर यांच्यावर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ हिमाचल प्रदेशातली बिलासपूर येथे काँग्रेसने मोर्चाचे आयोजन केल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसचेच सरकार आहे. तथापि, आपल्या माजी आमदारावर भारतीय जनता पक्षाच्या विद्यामान आमदाराने हल्ला केला, असा या पक्षाचा आरोप आहे. या मरहाण प्रकरणात मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. भारतीय जनता पक्षाने आरोपाचा इन्कार केला आहे.