कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरूद्द दिल्या घोषणा
सातारा प्रतिनिधी
आभाळातनं पडलं गठूळं…या सरकारने केलं वाटूळं, मोदींना हटवा…महागाई घालवा, अशा घोषणा देत हातात निषेधाचे फलक हाती धरून काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीवनावश्यक वस्तूवर वाढवलेल्या जीएसटीच्या विरोधात आंदोलन केले. महिला पदाधिकाऱ्यांनी विटांची चुल मांडून त्यावर भाकरी थापली. मोदींना भाकरी खायला पाठवणार असे भाकरी बनवणाऱ्या सुषमा राजेमहाडिक यांनी आंदोलनावेळी सांगितले.
काँग्रेसच्या केंद्रिय नेतृत्वाकडून देशभर आदेश मिळताच काँग्रेसच्यावतीने जिह्यात आंदोलन करण्याचे नियोजन करण्याच आले. जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या सुचनेनुसार काँग्रेसच्या महिला पदाधिकारी सुषमा राजेघोरपडे यांनी आंदोलनासाठी तयारी केली. चुलीसाठी विटा, तवा, जळण आणि रिकामा गॅस असे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचल्यावर प्रथम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखालीच शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्ंयाना निवेदन देण्यात आले. बाहेर आल्यावर महिला पदाधिकारी सुषमा राजेघोरपडे, मनिषा पाटील, धनश्री महाडिक, जिल्हाध्यक्ष अल्पना यादव यांनी विटांची चुल मांडून पीठ मळून चुलीवर भाकऱ्या थापल्या.
इकडे कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. आंदोलनानंतर सर्वच पदाधिकाऱ्यांना हे पोलिसांनी गाडीत घेतले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, नरेश देसाई, अन्वर पाशा खान, ऍड. दत्तात्रय धनावडे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झालेले होते.