Tarun Bharat

पीएफआयवरच बंदी का? RSS या संघटनेवर बंदी का नाही; काँग्रेस खासदारांचा सवाल

Congress MP Kodikunnil Suresh : केंद्र सरकारनं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संघटनेवर बंदी घातली. सोबतच हे. सीएफआय, ऑल इंडिया इमाम कौन्सिल, रिहॅब इंडिया फाऊंडेशन, नॅशनल वुमन फ्रंट यासारख्या संबंधित संघटनांनाही बेकायदेशीर संघटना घोषित केलं गेलं आहे. : केंद्रातील मोदी सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेस खासदार (Congress MP) आणि लोकसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद कोडीकुन्नील सुरेश यांनी टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी का नाही असा सवाल त्यांनी केंद्राला विचारला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ईडी आणि एनआयएनं देशातील अनेक शहरांमध्ये पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी सुरु केली आहे. यात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे. टेरर फंडिंग प्रकरणात आता या आरोपींची चौकशी केली जात आहे.

काय म्हणाले कोडीकुन्नील सुरेश
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद कोडीकुन्नील सुरेश म्हणाले, फक्त पीएफआयवरच बंदी का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी का नाही असा सवाल विचारला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घातली पाहिजे अशी आमची मागणी असल्याचं सुरेश यांनी म्हटलंय. पीएफआयवर बंदी हे समस्येचं निराकरण असू शकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देशात हिंदू दहशतवाद पसरवत आहे. आरएसएस आणि पीएफआय हे सारखेच आहेत, त्यामुळं सरकारनं दोघांवरही बंदी घातली पाहिजे, असंही सुरेश यांनी म्हटलंय. सुरेश यांच्या या विधानावरून वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Stories

डीआरडीओकडून क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

Patil_p

गुजरात : गोडाउनमध्ये स्फोट; चार जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

नेमबाज शाहू मानेला मिश्र दुहेरीत सुवर्ण

Archana Banage

तामिळनाडूत 4 टक्क्यांनी महागाई भत्त्यात वाढ

Patil_p

आधार-मतदार ओळखपत्र लिंकप्रकरणी आज सुनावणी

Patil_p

किरीट सोमय्यांना मोठा दणका; अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

Archana Banage