Tarun Bharat

महागाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर

Advertisements

आंदोलनावेळी राहुल गांधी, प्रियांका गांधी ताब्यात ः काळे कपडे परिधान करत कार्यकर्त्यांची निदर्शने

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी देशव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. याचदरम्यान राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर राहुल संसदेतून राष्ट्रपती भवन येथे मोर्चाने जात असताना पोलिसांनी त्यांना रोखत ताब्यात घेतले. याचदरम्यान प्रियांका गांधींनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही पुढे जाण्याची परवानगी दिली नाही. परिणामी, त्यांनी रस्त्यावर बैठक मारली. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते. आंदोलनादरम्यान अजय माकन, सचिन पायलट, हरीश रावत, अविनाश पांडे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व मोठय़ा नेत्यांना ताब्यात घेण्यात आले.

महागाई, जीएसटी आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध शुक्रवारी काँग्रेसने सकाळपासून संसद परिसरासह ठिकठिकाणी देशव्यापी निदर्शने केली. संसद परिसरात काळे कपडे परिधान केलेल्या काँग्रेसच्या खासदारांसह सोनियांनी प्रथम घोषणाबाजी करत सरकारविरोधात आवाज बुलंद केला. महागाईला विरोध करण्यासाठी देशभरातील काँग्रेस कामगार दिल्लीत पोहोचले होते. पक्ष मुख्यालयात राहण्याची व्यवस्था केली गेली होती, परंतु पावसामुळे सर्व व्यवस्था कोलमडल्याचे दिसून आले.

सोनिया गांधींचाही सहभाग

पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी संसदेच्या संकुलात निदर्शने केली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांसोबत संसदेबाहेर निदर्शने केली. राष्ट्रपती भवनात जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. राहुल गांधी नाराज दिसत होते. सरकारवर हल्लाबोल करताना त्यांनी काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरत नसल्याचा पुनरुच्चार केला. तुम्ही हुकूमशाहीचा आनंद घेत आहात, दररोज येथे लोकशाही मारली जात आहे. या सरकारने 8 वर्षात लोकशाही उद्ध्वस्त केली असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला.

प्रियांका गांधी यांची आघाडी

काँग्रेस मुख्यालयापासून काँग्रेसच्या निदर्शनाचे नेतृत्त्व प्रियांका गांधी यांनी केले. प्रियांका बॅरिकेडिंग तोडून पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी निघाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. याचदरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकारही घडला. काँग्रेसच्या या निदर्शनात अधीर रंजन चौधरी, सलमान खुर्शीद, पी चिदंबरम, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक खासदार, आमदार आणि नेते सहभागी झाले होते.

देशात अन्यत्रही आंदोलन

काँग्रेस कार्यकर्त्यांनी अन्यत्रही पायी मोर्चा काढून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राजस्थानमध्ये वेगवेगळय़ा जिल्हय़ांतील नेत्यांनी नवीन मार्गांनी निषेध नोंदवला. राजस्थानमधील मोठय़ा संख्येने काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते दिल्लीतील निषेधास उपस्थित राहण्यासाठी आले होते. बिहारमध्ये शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्त्वात शेकडो कार्यकर्त्यांनी पटना येथे आंदोलन केले. आंदोलन रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्यानंतर काहीवेळ गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसत घोषणा सुरू केल्या. पोलिसांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांना ताब्यात घेतले. बिहारप्रमाणेच छत्तीसगडची राजधानी रायपूर येथेही काँग्रेसने महागाईविरोधात निषेध केला.

Related Stories

‘इफ्फी’त पुढील वर्षी खासगी क्षेत्रालाही स्थान

Abhijeet Shinde

RBI चा मोठा निर्णय; रेपो रेटबाबत घोषणा

Abhijeet Shinde

शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या सुप्रिया सुळेंसह अनेक खासदारांना गाझिपूर बॉर्डरवर रोखलं

Abhijeet Shinde

मतदान दिवसाच्या 72 तास आधी बाईक रॅलींवर बंदी

Patil_p

दिल्लीत मिळणार मोफत लस; 1.34 कोटी लस खरेदी करणार : अरविंद केजरीवाल

Rohan_P

बिहारमध्ये ‘अग्निपथ’ योजनेविरोधात आंदोलन चिघळले, पाच ट्रेन पेटवल्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!