ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोर्टाच्या निर्णयानंतर काल उध्दव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्ह करुन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यभरातून सर्वसामान्यांच्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली. सरकार पडल्याने मविआ कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार होता. याअनुषंगाने आज बैठक घेण्यात आली असल्य़ाचे काॅंग्रेस नेत्यांनी सांगितले आहे. आज ते उध्दव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. बैठक संपल्यानंतर मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) , मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chwhan) यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बाळासाहेब थोरात म्हणाले, लोकशाहीत आमची भूमिका आम्ही बजावू.आता आम्ही सत्ताधारी नाही तर विरोधक म्हणून काम पाहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अशोक चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडी निश्चितच अस्तित्वात आहे. आम्ही मविआचे घटक म्हणून काम करणार आहोत. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray), माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी असे तीनही पक्ष एकत्र बसून पुढची भूमिका ठरवू असे ते म्हणाले. उध्दव ठाकरे यांना भेटून शुभेच्छा देणार आहोत. तसेच विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितल.