Tarun Bharat

के. एन. त्रिपाठींचा अर्जबाद; काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी ‘हे’ दोन नेते रिंगणात

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

काँग्रेस अध्यक्षपदासाठी तिसरे उमेदवार झारखंडचे माजी कॅबिनेट मंत्री के. एन. त्रिपाठी (N.K. Tripathi) यांचा अर्जबाद झाला आहे. त्यामुळे मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) विरुद्ध काँग्रेसमधील दुसऱ्या जी-२३ गटाचे नेते शशी थरुर (Shashi Tharoor)यांच्यात सामना रंगणार आहे.

काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदाची (Congress president election) प्रक्रिया सुरू झाली आहे. मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले की, ८ ऑक्टोबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. या दिवशी कोणाही नामांकण मागे न घेतल्यास निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. सध्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत दोन उमेदवार आमने-सामने आहेत.काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे, यामुळे त्याच दिवशी निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.

हे ही वाचा : इंडोनेशियात फुटबॉल सामन्यावेळी हिंसाचार; १२९ जणांचा मृत्यू

गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याच्यावरून शह काटशहाचे राजकारण सुरु होते. ही निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडचे विश्वासू मल्लिकार्जून खर्गे यांच्याविरुद्ध काँग्रेसमधील दुसऱ्या गटाचे नेते शशी थरुर असा सामना रंगणार आहे. तिसरे उमेदवार झारखंडचे माजी कॅबिनेट मंत्री के. एन. त्रिपाठी यांचा अर्जबाद झाला आहे.

Related Stories

NSD च्या अध्यक्षपदी ‘या’ अभिनेत्याची निवड

Tousif Mujawar

‘सत्ता’कारणात मोदींची 20 वर्षे पूर्ण

Amit Kulkarni

सलग पाचव्या महिन्यात जीएसटी 1 लाख कोटींवर

Patil_p

‘अग्निपथ’ला बिहारमध्ये जोरदार विरोध

Patil_p

स्टॅलिन विरोधात अलागिरी यांचा शड्डू

Patil_p

ऑक्टोबरपर्यंत पाच नव्या लसी

Patil_p
error: Content is protected !!