Tarun Bharat

लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये काँग्रेसला फटका बसणार!

Advertisements

वृत्तसंस्था/ थ्रिसूर

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केरळमध्ये 20 पैकी 19 जागा जिंकलेल्या असल्या तरी आगामी लोकसभा निवडणुकीत या राज्यात काँग्रेसला जबर दणका बसेल, असे भाकित केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले आहे. ते येथील एका जाहीर सभेत भाषण करत होते. ही सभा दिवंगत मार्क्सवादी नेते अझिकोडन राघवन यांच्या 50 व्या हौतात्म्य दिनाच्या निमित्ताने होती.

राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातील त्यांची जागा धोक्मयात आल्याची जाणीव झाल्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. ते मोठय़ा मतांनी विजयीही झाले होते. तथापि, आता या मतदारसंघातील मतदारांना राहुल गांधींना निवडून दिल्याचा पश्चाताप होत आहे, असा दावाही सभेत विजयन यांनी केला. त्यांनी भाजपवरही समाजात फूट पाडण्याचा आरोप केला. भाजपच्या धोरणांमुळे देशात धार्मिक कट्टरतावाद पसरत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

Related Stories

एसटी संपामुळे भक्तांना विठुदर्शनाचा ‘दुरावा’

Patil_p

प्रतिदिन 800 श्वानांचे पोट भरतेय महिला

Patil_p

येत्या दीड वर्षात मिळणार 10 लाख सरकारी नोकऱ्या

datta jadhav

5 राज्यांच्या निवडणुकीपूर्वी ओबीसींना गिफ्ट

Patil_p

उत्तरप्रदेशातील ‘राजकारणा’त दरवळणार सुगंध

Patil_p

अर्थव्यवस्था सावरण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची गरज

Patil_p
error: Content is protected !!