पुणे : आगामी पुणे महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या जिल्हा काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
महापालिका निवडणुकांसाठी सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. काँग्रेसचीही आज जिल्हा कोअर कमिटीची बैठक पार पडली. बैठकीमध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. यावेळी नेतेमंडळी आणि सर्व कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वबळावर लढण्याची मागणी केली. त्यानंतर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ही मागणी मान्य करत महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. तसेच निवडणुकीसाठी इच्छुकांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची व पक्ष संघटनेची बांधणी करण्यास सुरूवात करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
अधिक वाचा : साखर उद्योगात गुंतवणूक करण्याची मानसिकता ठेवावी, पवारांची अपेक्षा