ऑनलाईन टीम / तरुण भारत :
गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा आता सुटणार आहे. पक्षाच्या अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार असून, 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. यासंदर्भात पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक सध्या सुरू आहे.
सध्या काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधींकडे आहे. मधल्या काळात राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले होते. मात्र, अनेक निवडणुकांत पराभव झाल्यानंतर राहुल गाधींनी अध्यक्षपद सोडले. यानंतर काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्तच होते. काँग्रेसच्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये कोण-कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अधिक वाचा : आमदारांच्या वर्तणूक नियमावलीत सुधारणा करण्यासाठी समिती