Tarun Bharat

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा कट उधळला, 2 दहशतवाद्यांना अटक

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

जम्मू-काश्मीरमधील तुकसानमध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’च्या ए श्रेणीतील 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याची या दहशतवाद्यांची योजना होती. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा हल्ला होणार होता. तुकसानमधील गावकऱ्यांनी या दहशतवाद्यांना पकडून दिल्याने अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा कट उधळला गेला. फैजल अहमद डार आणि तालिब हुसेन शाह अशी या दोन दहशतवाद्यांची नावं असून, त्यांच्याकडून दोन एके 47 रायफल, ग्रेनेड, इतर शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.

रविवारी (ता. 3) सकाळी तुकसानमधील रियासी परिसरात ग्रामस्थांनी फैजल डार आणि तालिब हुसेन या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अमरनाथ यात्रेवर हे दहतशवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा हल्ला होणार होता. त्यासाठी तालिब हुसेननं यापूर्वी राजौरीमध्ये दोन बॉम्बस्फोटाची चाचणी घेतली होती. तालिब हुसेन या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. हे दोघे तुकसान जिल्ह्यातील रियासी गावात लपून बसले होते. त्यांनी पुढील हालचाल करण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांच्या मदतीनं पोलिसांनी त्यांना अटक केली.

दरम्यान, या हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेला तालिब हुसेन हा दराज कोटरंका, बुधान, जि. राजौरी येथील भाजप अल्पसंख्याक आघाडी जम्मू प्रांताचा आयटी आणि सोशल मीडिया प्रभारी असल्याची माहिती मिळत आहे. दहशतवादी तालिब हुसैन शाहचे जम्मू-काश्मीर भाजप अध्यक्ष रवींद्र रैना यांच्यासोबत अनेक फोटो आहेत. या दहशतवाद्यांना पकडून देणाऱ्यांना ग्रामीण पोलिसांनी 2 लाख तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी 5 लाखांचं बक्षिस जाहीर केलं आहे.

Related Stories

मुंबईसह ठाण्यात निर्बंध झुगारुन मनसेने फोडली दहीहंडी

Archana Banage

मागील 24 तासात महाराष्ट्रात 434 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह; 4 मृत्यू

Tousif Mujawar

1 जूनपासून महागणार देशांतर्गत विमानप्रवास

Patil_p

‘रिलायन्स’च्या बैठकीत अनेक नव्या योजनांची घोषणा

Amit Kulkarni

वादग्रस्त नेत्यामुळे समाजवादी पक्षासमोर पेच

Patil_p

गुजरातमध्ये लव्ह जिहाद कायदा

datta jadhav