Tarun Bharat

कॉन्स्टेबलच्या पतीची आत्महत्या

पोलीस पत्नी, पोलीस मेव्हुणी व सासू-सासऱयांवर गुन्हे दाखल

प्रतिनिधी/ म्हसवड

म्हसवड पोलीस ठाण्यात पोलीस म्हणून कार्यरत असलेल्या शिल्पा नवनाथ दडस व तिची फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस म्हणून कार्यरत असलेली अनिता लाला गाडेकर व या दोघीचे आई शिताबाई, वडील लाला नागू खांडेकर (रा. गाडेकरवाडी पो. भाटकी ता. माण) यांच्या सततच्या धमक्या व त्रासाला कंटाळून माझे बंधू नवनाथ मारुती दडस यांनी आत्महत्या केल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात शांताबाई हिराचंद वलेकर (रा. कोथळे, ता. माळशिरस) यांनी दिली आहे. याप्रकरणी पत्नीसह मेव्हुणी व सासू-सासरे या चौघांवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

  याबाबत मयत नवनाथ दडस यांच्या भगिनी शांताबाई हिराचंद वलेकर यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिलेली माहिती अशी, नवनाथ दडस हा पुणे येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. या दरम्यान शिल्पा व नवनाथ या दोघांनी घराच्यांचा विरोध डावलून लग्न केले होते. दोघीही बहिणी फलटण तालुक्यात पोलीस म्हणून काम करत होत्या. शिल्पाची बहिण अविवाहित असुन ती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तर शिल्पा शहर पोलीस ठाण्यात काम करत होती. लॉकडाऊनमुळे नवनाथ यांची नोकरी गेली होती. दोन वर्षे तो गावी शेती करत होता. वर्षापूर्वी शिल्पा दडस हिने म्हसवड पोलीस ठाण्यात बदली करुन घेतली होती. अधूनमधून नवनाथ म्हसवड येथे पत्नी शिल्पा हिस भेटायला यायचा. काम करत नसल्याने दोघांमध्ये सतत वाद संशयावरून होत होते. यावरून सासरे व सासू गाडेकर हे ही सतत त्रास देत होते.

25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी शिल्पा आई वडिलांच्या घरुन पोलीस वसाहती मधील रुमवर नवनाथ त्या रात्री एकटाच झोपला होता. शिल्पा दडस सकाळी रुमवर आल्यावर रुममधील अवस्था बघुन दोघांमध्ये वाद झाले व त्यानंतर   शिल्पा पोलीस कार्यालयात कामास गेली. नवनाथ दडस रुममध्ये एकटाच होता व  शिल्पा पोलीस ठाणे कार्यालयात कामावर असताना नवनाथ याने पोलीस वसाहतीतील रुममधील लाकडी आडय़ाला दुपारच्या वेळी नायलॉन रस्सीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा आरोप चौघांवर करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी प्रा. दिनेश गुंड यांची पंच म्हणून निवड

Amit Kulkarni

सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधितांना विविध सेवाभावी संस्थाकडून मदतीचा ओघ सुरु

Archana Banage

किल्ले अजिंक्यताऱ्यावर होणार रोप वे

datta jadhav

शेखर सिंह यांनी घेतला पदभार

Patil_p

सातारा जिल्ह्याची चिंता वाढली; १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Archana Banage

राज्यातील राजकीय सत्तानाट्य संपलं, बहुमताचा डाव शिंदे-भाजप गटाने जिंकला

Rahul Gadkar
error: Content is protected !!