Tarun Bharat

देशाची घटना-सार्वभौमत्व धोक्यात – दिग्विजय सिंह

ऑनलाईन टीम/तरुण भारत

Bharatjodokolhapur: देशात मुस्लिम-हिंदू यांच्यात भेदभाव निर्माण करण्याचे काम सुरु आहे. कोणत्या धर्माचा द्वेष करण्यापेक्षा भारतीय म्हणून जगले पाहिजे. पण देशात अशांतता पसरवून देशातील सार्वभौमत्व आणि घटना धोक्यात आणली जात आहे. अशी टीका भाजपवर (BJP) मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (digvijay singh) यांनी केली.

कोल्हापूरात झालेल्या नफरत छोडो भारत जोडो या मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान, कोल्हापुरचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या लाईव्ह प्रेक्षपण साठी तयार केलेल्या एलएडी व्हॅनच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे सिंह म्हणाले, या देशात प्रत्येक जातीची, धर्माची लोक राहतात. पण सध्या अशा विविधता असलेल्या देशात तेढ निर्माण केला जातं आहे. या देशातील विविधता धोक्यात आणण्याचे काम केले जात आहे. या देशात एकता टिकली पाहिजे. जर देशात विविधता आणि एकता टिकली नाही तर देशाच्या सार्वभौमत्वला धोका पोहचेल, असे मत दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा : जयदेव ठाकरे शिंदेंसोबत तर मुलगा उद्धव ठाकरेंसोबत

या देशातील एका गरीब कुटुंबात राहणाऱ्या मुलाने देशाची घटना लिहली. त्यामुळे देशात लोकशाही अस्तित्वात आली. त्यामुळे सामान्य कुटुंबातील व्यक्तीला स्वातंत्र्य मिळाले. पण देशातील आजची परिस्थिती पाहता घटना धोक्यात आली आहे. अशा शब्दात दिग्विजय सिंह यांनी भाजप, मोदी आणि शहा सरकारवर निशाणा साधला.

या देश सर्वांचा आहे. कोणत्या जाती-धर्माचा म्हणण्यापेक्षा हा भारतीयांचा देश आहे. हें लक्षात ठेवले पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक मोहन भागवत मशीद मध्ये जात आहेत. रामदेव बाबा सोनिया गांधी यांची प्रशंसा करत आहेत. नक्कीच राहुल गांधी यांच्या यात्रेचा प्रभाव पडत आहे. देशात बदल होत आहे. हे यावरूनच सिद्ध होते. असे मत सिंह यांनी व्यक्त केले.

दिग्विजय सिंह सतेज पाटील यांचे कौतुक
राहुल गांधी यांच्या भारत जोडो या यात्रेचे महत्व गाव-खेड्यापर्यत पोहचण्यासाठी 13 एलएडी व्हॅन तयार करण्यात आल्या आहेत. त्या नक्कीच राहुल गांधी यांच्या विचारला सामान्यपर्यंत पोहचवतील. केवळ मुंबई आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची जवळीक साधतात. पण सतेज पाटील यांनी त्याच्या कार्यातून ते नक्कीच त्यांच्या हृदयात स्थान मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला.

Related Stories

अपघाताचा बनाव करून मुलानेच केला वडिलांचा खून

Archana Banage

कोल्हापूर शहरातील दूध विक्री उद्यापासून बंद

Archana Banage

जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंची 450 रुपयांची भीक केली परत

Patil_p

शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात कलागुणांबरोबर तांत्रिक कौशल्याची देणगी

Archana Banage

लोकसभेच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा

prashant_c

कोल्हापूरचा सराफ बाजार राहणार तीन दिवस बंद

Archana Banage