Tarun Bharat

गणेशोत्सवाच्या मंडप उभारणीला प्रारंभ

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

गणेशोत्सव अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. बेळगाव शहर व उपनगरांमध्ये मंडप उभारणीला सुरुवात करण्यात आली. काही मंडळांनी यावषी आगमन सोहळे आयोजित केले असल्यामुळे गणेशचतुर्थीपूर्वी दोन ते तीन दिवस अगोदरच गणेशमूर्ती मंडपात येणार असल्याने मंडप उभारणीसाठी रात्रंदिवस काम सुरू करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे.

  बुधवार दि. 31 रोजी गणेशचतुर्थी आल्यामुळे केवळ एक ते दीड आठवडा शिल्लक राहिला आहे. मागील दोन वर्षांत कोरोना निर्बंधामध्ये गणेशोत्सव साजरा करावा लागला. यावषी मात्र मोठय़ा थाटामाटात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळांचे पदाधिकारी व गणेशभक्तांनी घेतला आहे. यावषी अनेक मंडळांनी देखावे साकारण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने मंडप उभारणी सुरू केली आहे. बेळगाव शहर व उपनगरात 370 हून अधिक सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रति÷ापना केली जाते.

 मागील दोन वर्षांत मंडळांनी जवळच्या मंदिरांमध्ये गणेशमूर्तींची प्रति÷ापना केली होती. त्यामुळे मंडप डेकोरेटर्स, साऊंड, लायटींग यांचे नुकसान झाले होते. यावषी मात्र मंडळांचे भाडे मिळाल्यामुळे या व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. नारळी पौर्णिमेपासून मंडप मुहूर्तमेढ करण्यात येत असून मंडप उभारणीला वेग आला आहे.

पावसाचा व्यत्यय

बेळगाव तालुक्मयासह परिसरात 15 ते 20 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे मंडप उभारणीसह गणेशोत्सवाच्या तयारीमध्ये व्यत्यय येत आहे. मंडप उभारणी करताना पाऊस येत असल्याने उभारणी करण्यासाठी वेळ लागत आहे. याचबरोबर बाजारपेठेमध्येही गणेशोत्सवासाठी लागणाऱया साहित्याचे स्टॉल उभे करण्यात गैरसोयी निर्माण होत आहेत.

Related Stories

कल्लेहोळ येथील रेशन वितरण सुरळीत करा

Patil_p

हलगा-मच्छे बायपासचे बुधवारी दुपारनंतर काम बंद

Amit Kulkarni

नवीन रेशनकार्डच्या कामाला गती

Amit Kulkarni

सोमवारी जिल्हय़ाला काहीसा दिलासा

Amit Kulkarni

उरली ना जखमांची नवलाई, जिंकायचीय उद्याची लढाई!

Amit Kulkarni

किसान रेल्वे बेळगावमध्ये दाखल

Patil_p
error: Content is protected !!