आमदार अंजली निंबाळकर यांचे उद्गार
खानापूर : तालुक्यातील शासकीय इमारती नव्याने उभारल्या. माझ्या कार्यकाळात शासकीय इमारतीना उजाळा मिळाला. हे मी माझे भाग्य समजते. माझ्या प्रयत्नातून तालुक्यातील जास्तीत जास्त इमारती नव्याने उभारल्या. या सर्व इमारती सुसज्ज व उत्तम दर्जाच्या असून सर्वच शासकीय स्तरातील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत उत्साहात वाढ होणार आहे. भविष्यात खानापूर तालुक्याचा कायापालट करण्याचे माझे स्वप्न आहे. आणि त्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्यरत राहीन, असे उद्गार खानापूर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना आमदार अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, पोलीस खात्याशी माझे नाते कौटुंबिक आहे. माझ्याच घरातील सदस्य या खात्यात सेवा बजावत आहेत. पोलीस सेवेत असताना पोलिसांची कायदा सुव्यवस्था आणि शांतता टिकवताना किती झगडावे लागते. तसेच कुटुंबासाठी जराही वेळ देता येत नाही.
पोलिसांची तालुक्यातील सेवा कौतुकास्पद
कुटुंबातील आनंदाच्या क्षणीही कुटुंबाला वेळ देता येत नाही. अशा सुखाचा त्याग करून पोलीस आपली सेवा बजावत असतात. याचा निश्चित मला अभिमान आहे. खानापूर पोलिसांचे कार्य व सेवा कौतुकास्पद आहे. यापुढेही त्यांनी सामाजिक जाणीव ठेवून कायद्याच्या चौकटीत आपली सेवा बजावावी, असे त्या म्हणाल्या. य् ाावेळी विधानपरिषद सदस्य एम. नागराजू म्हणाले, अंजली निंबाळकर यांचा राजकारणापलीकडे विकासाचा दृष्टिकोन असून त्यांनी पाच वर्षात तालुक्यात बरीच विकासकामे राबविली आहेत. कार्यक्रमाला जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख एम. वेणूगोपाळ, पोलीस निरीक्षक रामचंद्र नायक, डी. एस. पी. रवि नायक, नगराध्यक्ष नारायण मयेकर, अप्पय्या कोडोळी, मुख्याधिकारी राजेश वठार यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सरकारी दवाखान्यात वास्तूशांती
य् ाsथे नव्याने बांधण्यात आलेल्या बालसंगोपन सरकारी दवाखान्यात रविवारी सकाळी धार्मिक विधी, गणेशपूजा व वास्तूशांती करण्यात आली. यावेळी तालुका वैद्याधिकारी संजीव नांद्रे, डॉ. नारायण व•ाrन्नावर व इतर कर्मचारी उपस्थित हेते. आमदार अंजली निंबाळकरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर आमदार निंबाळकर यांनी डॉक्टरांशी चर्चा केली व त्यानंतर संपूर्ण इस्पितळाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. येत्या काही दिवसात हे इस्पितळ सर्व यंत्रसामग्रीसह सुसज्ज झाल्यानंतर लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे.