महिला-बालकल्याण खात्याच्यावतीने शहरात तीन ठिकाणी उभारणी
प्रतिनिधी/बेळगाव
महिलांना सुरक्षितता आणि आसरा मिळावा, यासाठी महिला व बाल कल्याण खात्यामार्फत शहरात ठिकठिकाणी कर्मचारी महिला हॉस्टेलची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे कर्मचारी महिलांचा आसऱयाचा प्रश्न मार्गी लागला आहे. ऑक्टोबर अखेरीस या तिन्ही हॉस्टेल्सचे उद्घाटन होऊन ती महिलांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत, अशी माहिती महिला व बालकल्याण खात्याचे उपनिर्देशक ए. एन. बसवराजू यांनी दिली.
शहरात विविध ठिकाणी काम करणाऱया कर्मचारी महिलांची संख्या अधिक आहे. दरम्यान, या महिलांसमोर आसऱयाचा प्रश्न होता. भाडय़ाचे घर घेणे अशक्मय आहे. अशा परिस्थितीत महिला व बालकल्याण खात्याने शहरात तीन ठिकाणी महिला हॉस्टेल्सची निर्मिती केली आहे. पिरनवाडी, आझमनगर आणि उद्यमबाग परिसरात ही हॉस्टेल उभारण्यात आली आहेत. त्यामुळे कर्मचारी महिलांना आता आसरा घेणे सोयीस्कर झाले आहे. सरकारी, खासगी कंपन्या आणि इतर ठिकाणी काम करणाऱया महिलांची संख्या वाढली आहे. या करिता महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन खात्याने केवळ महिलांसाठीच हॉस्टेलची उभारणी केली आहे.
शहरात दिवसा किंवा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱया महिलांची संख्या वाढत आहे. विशेषतः उद्यमबाग आणि आझमनगर परिसरात महिलांना आसऱयासाठी धडपड करावी लागत आहे. शिवाय भाडय़ाने घर घेणेदेखील शक्मय नाही. अशा परिस्थितीत महिला व बालकल्याण खात्याची हॉस्टेल सुविधा आधार ठरणार आहे. महिलांना सवलतीच्या दरात ही हॉस्टेल सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या हॉस्टेल इमारतीत महिलांसाठी बेडरूम, शौचालय आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परराज्यांतून आणि परजिल्हय़ांतून आलेल्या महिलांना वास्तव्य करणे सोयीस्कर होणार आहे.
हॉस्टेलचे काम अंतिम टप्प्यात
शहरातील तीन ठिकाणी हॉस्टेलची निर्मिती करण्यात आली आहे. याचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. रंगरंगोटी आणि इतर किरकोळ कामे पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर अखेरीस कर्मचारी महिलांना हॉस्टेल उपलब्ध केले जाणार आहे.
ए. एम. बसवराजू (उपनिर्देशक, महिला व बालकल्याण खाते)