काम प्रगतीपथावर, कॅन्टीनसोबतच पार्किंगची सोय
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हा पंचायतच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या उपाहारगृहाचे (कॅन्टीन) काम प्रगती पथावर आहे. येथील जुने कॅन्टीन हटवून त्या ठिकाणी नवीन कॅन्टीनची उभारणी केली जात आहे. शिवाय या ठिकाणी विविध अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांच्या सेवेत आधुनिक सेवांनीयुक्त कॅन्टीन उपलब्ध होणार आहे.
कार्यालयाच्या आवारात असलेले जुने कॅन्टीन हटवून त्या ठिकाणी नवीन कॅन्टीन उभारले जात आहे. या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगचीही गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे खाली वाहनांसाठी पार्किंग आणि पहिल्या मजल्यावर कॅन्टीनची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे जिल्हा पंचायतमध्ये येणाऱया नागरिकांना कॅन्टीनची सुविधा उपलब्ध होणार आहे.
जिल्हा पंचायत कार्यालयात विविध शासकीय कामासाठी येणाऱया नागरिकांची संख्या अधिक आहे. शिवाय कर्मचारीवर्गाची संख्या देखील मोठी आहे. तसेच या ठिकाणी विविध शासकीय अधिकाऱयांच्या बैठका आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे कॅन्टीनची आवश्यकता आहे. त्यानुसार जुने कॅन्टीन हटवून त्या ठिकाणी नवीन कॅन्टीनची इमारत उभारली जात आहे. जिल्हा पंचायत कार्यालयात पार्किंगचा विषय गंभीर बनला आहे. 19 शासकीय खात्यांचा कारभार या ठिकाणी चालतो. त्यामुळे नागरिकांची ये-जा असते. मात्र येथे येणाऱया नागरिकांना पार्किंग मिळत नसल्याने रस्त्यावरच गाडी पार्क करून कार्यालयात जावे लागत आहे. दरम्यान एखादा मोर्चा किंवा मिटींग असल्यास पार्किंगचा गोंधळ उडत आहे.