Tarun Bharat

लाच स्वीकारताना बांधकाम विभागाचा कर्मचारी जाळ्यात

ना हरकत प्रमाणपत्रासाठी मागितली 30 हजाराची लाच: वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावे मागितले पैसे

प्रतिनिधी/पंढरपूर

जमीन एन ए करण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तीस हजार रूपयांची लाचेची मागणी करून त्यापैकी पंधरा हजार रूपयांची लाच स्वीकारताना पंढरपूर येथील बांधकाम विभागातील कर्मचाऱयास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पडकले.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील शेतकऱयाची जमीन एन ए. करायची असल्याने त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यामुळे त्या शेतकऱयाने 13 जून रोजी येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे अर्ज करून पाठपुरावा करीत होते. यावेळी येथील भांडार कारकून या पदावर कार्यरत असणारे चंद्रकांत अभिमन्य टोणपे (वय 58) यांनी त्या शेतकऱयाकडे 30 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. यामुळे शेतकऱ्याने लाचलुचपथ विभागाकडे आपली तक्रार नोंदवली. त्यानंतर मंगळवारी 14 रोजी मागणी केलेल्या रक्कमेतील सुमारे 15 हजार रूपये स्वीकारताना टोणपे यांना येथील ठाकरे चौकामध्ये रंगेहात पथकाने पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, प्रमोद पकाले, सल्लीम मुल्ला, उमेश पवार, शाम सुरवसे यांच्यासह इतर अधिकारी यांनी केली.

Related Stories

Solapur : आरोग्य शिबिरात दोन लाख रुग्णांची तपासणी करणार -प्रा. शिवाजीराव सावंत

Abhijeet Khandekar

कर्तव्य बजावताना पोलिसाच्या अंगावर गाडी घातल्याने मृत्यू

Archana Banage

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा

prashant_c

सोलापूर : संचारबंदी उल्लंघनप्रकरणी किराणा व कापड दुकानदारावर गुन्हे दाखल

Archana Banage

जमीन नावावर करण्यासाठी अंगठा देत नसल्याच्या कारणावरून जावयाने केला सासूचा खून

Archana Banage

आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण नको

Archana Banage